ajit pawar sakal
पुणे

Ajit Pawar : सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी घेतला पुण्याच्या प्रकल्पांचा आढावा

शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच पुणे शहर व जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा ऑनलाइन बैठकीत आढावा घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच पुणे शहर व जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा ऑनलाइन बैठकीत आढावा घेतला. राज्य सरकारतर्फे काय मदत लागणार असेल तर त्यासंदर्भात प्रस्ताव पाठवा, आवश्‍यक ती मदत केली जाईल, अशी सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यामुळे ते दर शुक्रवारी किंवा शनिवारी विधान भवन येथे बैठक घेऊन शहर व जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत होते.

राज्यात शिंदे, फडणवीस सरकार आल्यानंतर अजित पवार हे विरोधीपक्षनेते होते. त्यामुळे आठवड्याच्या आढावा बैठका बंद झाल्या. गेल्याच महिन्यात अजित पवार यांनी बंड करून शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

या सरकारमध्ये पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री अजित झाल्यानंतर सुमारे एक महिना ते पुण्यात आलेले नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे पुणे दौरे सुरू झाले आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज दुपारी महापालिका, जिल्हा प्रशासन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. त्यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यःस्थिती काय आहे याची माहिती घेतली.

पुण्यातील मुळामुठा सुधार प्रकल्प, नदी काठ सुधार, समान पाणी पुरवठा, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो, पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल, चांदणी चौक उड्डाणपूल, पुणे नाशिक रेल्वेचे भूसंपादन, रिंग रोडचे भूसंपादन या प्रकल्पांबाबत चर्चा केली. तसेच पुणे शहरात प्रस्तावित असलेल्या खडकवासला ते खराडी मेट्रो, पौडफाटा ते माणिकबाग या प्रकल्पांचीही माहिती घेतली.

शहर व जिल्ह्यातील प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारतर्फे काही मदत आवश्‍यक असल्यास त्याबाबत माहिती सादर करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले.

शिवाजीनगर-हडपसर मेट्रोसाठी स्वतंत्र बैठक

शहरात शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. या मार्गाचे काम करण्यासाठी पीएमआरडीए आणि महामेट्रो या दोन्ही संस्थांनी तयारी दर्शविली आहे. पण नेमके काम कोणी करावे यावर एकमत झालेले नाही. आजच्या बैठकीतही यावर चर्चा झाली, पण त्यावर तोडगा निघू शकला नाही. त्यावर अजित पवार यांनी यासंदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, असे अधिकाऱ्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT