Ajit Pawar esakal
पुणे

Ajit Pawar: पुण्यात अजितदादांचा 'मोहरा' फुटणार? शरद पवारांचा सर्वात मोठा धक्का!

Deepak Mankar: अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून दीपक मानकर यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती. त्यांनी कसबा पेठ मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती.

Sandip Kapde

पुण्यात शरद पवार यांचा मोठा धमाका पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड येथील अजित पवार गटाला भगदाड पाडल्यानंतर पुण्यात अजित पवार यांचा मोहरा शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. दीपक मानकर फुटणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

दीपक मानकर यांच्या बंडखोरीची शक्यता

अजित पवार यांचा महत्वाचा चेहरा आणि सहकारी दीपक मानकर फुटले तर पुण्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसेल. सरकारनामाचे संपादक ज्ञानेश सावंत म्हणाले, "लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या घड्याळाची काटे उलट फिरतात की काय अशी शंका यावी परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये निर्माण झाली आहे."

पिंपरी चिंचवडमधील महत्वाचे वजन

पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांचे मोठे वजन आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यामध्ये माजी आमदार, माजी नगरसेवक आहेत, ज्यांनी शरद पवार यांची भेट घेत पक्षात प्रवेश केला आहे. या पुढच्या काळात माजी नगरसेवक शरद पवार गटात येवू शकतात.

दीपक मानकर यांचा राजकीय प्रवास-

अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून दीपक मानकर यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती. त्यांनी कसबा पेठ मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती. त्यानंतर त्यांचे समाधन झाले नाही. त्यांना आमदार व्हायचे आहे. मध्यंतरी ते विधानपरीषद निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते. त्यांना प्रफुल्ल पटेल यांनी शब्द दिला होता, अशी माहिती ज्ञानेश सावंत यांनी दिली.

बंडखोरीच्या शक्यतेवर चर्चा

या सर्व गोष्टींचा विचार करता दीपक मानकर शरद पवार गटात जावू शकतात. त्यांना आमदार व्हायचे आहे. त्यामुळे आपल्या राजकीय स्वार्थासाठी ते बंड करु शकतात. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील एनसीपी नेत्यांची स्थिती

यापूर्वी त्यांच्या पक्षाच्या एनसीपी पिंपरी-चिंचवड युनिटमधील चार मोठ्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. पार्टी सोडणाऱ्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. एनसीपी (अजित गट) पिंपरी-चिंचवड युनिटचे प्रमुख अजित गवाहाने, एनसीपी पिंपरी-चिंचवड विद्यार्थी विंगचे प्रमुख यश साने, माजी नगरसेवक राहुल भोसले आणि पंकज भालेकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT