Ajit Pawar statement next generation will never forgive if rulers take wrong decision  sakal
पुणे

राज्यकर्ते चुकीचा निर्णय घ्यायला लागले तर पुढची पिढी कधीही माफ करणार नाही; अजित पवार

अमरसृष्टी हौसिंग सोसायटीच्या सोलर पॉवर प्रकल्पाचे उद्घाटन

कृष्णकांत कोबल ------------------------

हडपसर : लोकभावना विचारात न घेता कोणाच्यातरी सांगण्यावरून फुरसुंगी, उरळी देवाची नगरपालिका जाहीर करून टाकली. महापालिकेतील समावेशाने कोणाची तरी गोडाऊनचा टॅक्स वाढतो किंवा कुणाच्या फायद्यासाठी तात्पुरता विचार करून राज्यकर्ते असा निर्णय घ्यायला लागले तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.

त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पुढील वीस पंचवीस वर्षे डोळ्यासमोर ठेवून तो घ्या. आऊट घटकेचा निर्णय घेऊ नका, असा सल्ला राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

हडपसर येथील अमरसृष्टी हौसिंग सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या ४० किलो वँट क्षमतेच्या सोलर पॉवर जनरेशन प्लँटचे उद्घाटन विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

आमदार चेतन तुपे, हेमलता मगर, सुनील गायकवाड, निलेश मगर, प्रशांत जगताप, योगेश ससाणे, डॉ. शंतनु जगदाळे, सोसायटीचे चेअरमन स्वप्नील आदी यावेळी उपस्थित होते. विरोधीपक्ष नेते पवार म्हणाले, "येत्या काळात विजेचे दर मोठ्याप्रमाणात वाढलेले असतील. त्यामुळे अपारंपरिक उर्जेला आपण प्राधान्य दिले पाहिजे.

अमरसृष्टी सोसायटीने हा प्रकल्प राबवून चांगला आदर्श दिला आहे. रहिवाशांनीही आपापल्या बंगल्यावर असे संच बसवून विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. कचरा, सांडपाणी व्यवस्थापन याहारख्या प्रकल्पांवरही सगळ्याच सोसायट्यांनी लक्ष दिले पाहिजे.

अंतर्गत भांडणे झाली की सोसायटी मध्ये प्रगती थांबते. मी देखील एका सोसायटी चा अध्यक्ष आहे. सगळ्या गमती जमती मला माहिती आहेत.' सोसायटीने पर्यावरण पूरक उपक्रम राबविल्या बद्दल त्यांनी अभिनंदनही केले.

चेअरमन स्वप्नील धर्मे म्हणाले, "सोसायटीअंतर्गत रस्त्यावरील दिवे, पंप, स्विमिंग पूलचे पंप आदी ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दरमहा एक लाख वीस हजार रुपये इतके बिल येत होते.

विजेची बचत व पर्यावरण रक्षणाच्यादृष्टीने सोसायटीने सोलर पॉवर प्लांटचा निर्णय घेतला. यातून दरमहा एक लाख वीस हजार रुपयांची वीज निर्मिती होणार असून सोसायटीचे वीजबिल शून्य होणार आहे.

या प्रकल्पाला बावीस लाख रुपये इतका खर्च आला असून हा खर्च केवळ दोन वर्षांच्या लाईट बिल इतका आहे. कोणत्याही शासकीय सवलतीशिवाय सोसायटीने हा उपक्रम राबविला आहे. या प्रकल्पाचे आयुर्मान पंचवीस वर्षे असून पुढची त्या वीस वर्षे किमान पंधरा लाख रुपये इतकी वार्षिक बचत यामुळे होणार आहे.'

संस्थेचे संचालक महेंद्र टिळेकर, पंढरी पवार, प्रताप पवार, एम. टी. मानुअल, शिरीष तुपे, अनिल दगडे, संदीप जाधव, टी. के. गायकवाड, केशव शिंदे, कलावती वामाने यांनी संयोजन केले. अनिल व्हावळ यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT