Bal KalyanSanstha  sakal
पुणे

Bal KalyanSanstha : दिव्यांगांसाठीचा अभ्यासक्रम देशात मार्गदर्शक ठरेल ; प्रतापराव पवार यांचा विश्‍वास , गांधर्व मंडळ, बालकल्याण संस्थेतर्फे प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

औंध : ‘‘दिव्यांगांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालकल्याण संस्था सातत्याने विविध प्रकारे कार्य करीत आहे. या वर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ आणि बालकल्याण संस्थेने निःस्पृहपणे खास दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देशातील पहिलाच प्रयोग असलेला नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम देशभरात आदर्श आणि मार्गदर्शक ठरणार असून दिव्यांगांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील,’’ असा विश्वास बालकल्याण संस्था आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केला.

गायन, वादन, नृत्य या कला शिक्षणासाठी प्रारंभिक ते विशारदपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे उद््घाटन करताना ते बोलत होते. औंध येथील बालकल्याण संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, रजिस्ट्रार विश्वास जाधव, नृत्यांगना सौदामिनी राव, ‘बालकल्याण’च्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतापराव पवार म्हणाले की, ‘‘हा महत्त्वाचा दिवस असून या संस्थांनी नव्या क्षेत्रात उमेदीने पाऊल टाकले आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी गांधर्व मंडळाचा शिक्षणासाठी उपयोग करून या कार्यातील प्रामाणिकपणातून पुढील दोन-तीन वर्षांत विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येईल.’’

जाधव यांनी सांगितले की, ‘पंडित पलुसकर यांच्या कार्याची परतफेड म्हणून दिव्यांगांसाठी हा पहिलाच अभ्यासक्रम सुरू केला आहे. भविष्यात अनुभवानुसार बदल करण्यात येतील. यात सामान्य अभ्यासक्रमासारखीच मौखिक परीक्षा असेल. यासाठी वेगळी परीक्षा व्यवस्था आणि शिक्षक नियुक्त करण्यात येतील. दिव्यांग विद्यार्थी संख्या जास्त असेल तेथे परीक्षा केंद्र सुरू केले जाईल. मान्यताप्राप्त शिक्षकांकडूनच मूल्यमापन करण्यात येईल.’

पुरी म्हणाले की, ‘‘दिव्यांगासाठी सुरू केलेला देशातील हा असा सर्वांत पहिला अभ्यासक्रम आहे. दिव्यांगांसाठी झटणाऱ्या संस्थांमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे नाव अग्रणी राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना आता काळजी करण्याची गरज नाही. हा पहिलाच अभ्यासक्रम असून हळू हळू यात सुधारणा होईल.’’ या वेळी राव यांनीही मनोगत व्यक्त केले. पानसे यांनी आभार मानले.

देशभरातील दिव्यांगांना फायदा

दिव्यांगांच्या गायन, वादन, नृत्य या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे, या उद्देशातून अखिल भारतीय गांधर्व मंडळ आणि बालकल्याण संस्थेमार्फत हा देशपातळीवर अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. याचा फायदा देशभरातील हजारो दिव्यांग मुलांना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"वाजत गाजत गुलाल उधळत..." शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा धमाकेदार टीझर; ठाकरेंचा आवाज अन् फटाक्यांची आतिषबाजी, पाहा व्हिडिओ

RBI MPC Meeting: गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतला मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

Latest Maharashtra News Updates : बांद्रा पश्चिम विधानसभेत तिरंगी लढतीची शक्यता

कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? सिद्धरामय्यांविरुद्ध FIR दाखल होताच 'ही' दोन नावं आली चर्चेत

Kajol Video: बिल्डिंगमध्ये शिरताच स्टाफवर भडकली काजोल; रागीट रूप पाहून नेटकरी म्हणाले- ही पण...

SCROLL FOR NEXT