Pune  sakal
पुणे

Pune : महिलेच्या मृतदेहासह मुलांनाही नदीत फेकले;इंदोरीजवळील ‘इंद्रायणी’तील प्रकार ,चिमुरड्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे : गर्भपातावेळी विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाल्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. यावेळी तिची दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागल्याने त्यांचा आवाज गप्प करण्यासाठी आरोपी प्रियकर व त्याच्या मित्राने त्यांनादेखील नदीत फेकून दिले. याबाबत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

समरिन निसार नेवरेकर (वय २५, रा. वराळे, ता. मावळ), इशांत निसार नेवरेकर (वय ५), इजान निसार नेवरेकर (वय २) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय ३७, रा. वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय ४१, रा. डॉन बास्को कॉलनी, सावेडी, ता. नगर) यांना अटक केली आहे तर गर्भपात करणारी महिला व संबंधित डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर याच्यापासून समरिन गर्भवती राहिली होती. तिचा गर्भपात करण्यासाठी तिला कळंबोली येथील अमर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत तेथील डॉक्टरांनी पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे न करता मृतदेह रविकांत गायकवाड व बुधवंत नामक महिलेच्या ताब्यात दिला. त्यानंतर आरोपी दगडखैर व गायकवाड यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने समरिनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले.

त्यानुसार त्यांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात मृतदेह फेकून दिला. यावेळी समरीनचा मुलगा इशांत (वय ५) व इजान (वय २) हे दोघेही रडू लागले. त्यामुळे आरोपींनी त्या दोघांनाही इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिले. ही घटना ६ ते ९ जुलै दरम्यान घडली आहे. या प्रकरणी दगडखैर व गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे तर गर्भपात करण्यास साहाय्य करणारी बुधवंत नामक महिला तसेच कळंबोली येथील अमर हॉस्पिटलमधील डॉक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT