esakal2.jpg 
पुणे

पुण्यातील सिंहगड कॅम्पस आंबेगाव पोलिस चौकी कुलूपबंद

रितेश चाळेकर

पुणे :  सिंहगड कॅम्पस आंबेगाव पोलिस चौकी कर्मचाऱ्यांअभावी कुलूपबंद झाल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे द्याव्यात, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे धाव घ्यावी लागत आहे. मुख्य म्हणजे पोलिस चौकीचा ठळक फलक असूनही पोलिस प्रशासन ती चौकी नसल्याचा दावा करत आहे. 

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याअंतर्गत सिंहगड कॅम्पस आंबेगाव पोलिस चौकी 2018 मध्ये स्थापन करण्यात आली. याअंतर्गत आंबेगाव बुद्रुकचा पूर्ण परिसर येत आहे. येथील इमारतीत दोन खोल्या आहेत. मात्र कर्मचारी नसल्याने ही चौकी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना कोणी वालीच उरला नाही.

 या चौकीअंतर्गत महाविद्यालयाचा परिसर येतो. तेथे दररोज छोटे मोठे वादाचे प्रसंग होत असतात. तसेच खुनासारखे गंभीर गुन्हेदेखील या भागात घडले आहेत. त्यामुळे येथे पोलिस चौकीची उभारणी करण्यात आली; मात्र चौकीच्या उद्‌घाटनानंतर काही महिन्यांतच ती बंद झाली. तेथे कर्मचारीच नसल्याने तिला कुलूप लावण्यात आले आहे.

चौकीत कोणच नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. तसेच गंभीर गुन्ह्यांसाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे धाव घ्यावी लागत आहे. ऐन वेळी तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांची पळापळ होते. तातडीच्या वेळी पोलिस चौकी कामी येत नसेल नसेल तिचा उपयोग काय, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता पोलिस प्रशासनाने नियमित कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे

मुख्य म्हणजे पोलिस प्रशासन या इमारतीवर ठळक फलक असूनही ती चौकी नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ती पोलिस चौकी आहे की नाही, यावरूनच संभ्रम निर्माण झाला आहे. 

'' पोलिस चौकी बंद असल्याने आमची तक्रार असल्यास गैरसोय होते. दुसरीकडे तक्रार देण्यास गेलो असता हद्दीचे कारण दिले जाते.'' 
- हनुमंत रगडे, नागरिक 

'' पोलिस चौकीत दोन कर्मचारी तरी उपस्थित असावेत. परिसरात विद्यार्थिनींची संख्या अधिक असल्याने महिला पोलिस कर्मचारी येथे असावेत.''  
- दशरथ राजे, सुरक्षारक्षक, सिंहगड कॉलेज 

'' रोज संध्याकाळी वाचनालयासाठी जावे लागते. मुलींची सुरक्षा लक्षात घेता पोलिस चौकी नेहमी चालू असावी.'' 
- अक्षरा शर्मा, विद्यार्थिनी, सिंहगड लॉ कॉलेज 

'' सिंहगड कॅम्पस आंबेगाव पोलिस चौकी ही चौकी नसून बिट मार्शलला थांबण्याची जागा आहे. आम्हाला तिथे फक्त त्या कारणासाठी जागा दिली आहे.'' 
- विष्णू पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT