Vel River Bridge under Flood Water sakal
पुणे

Ambegaon Rain Update : आंबेगाव तालुक्यात दोन दिवसात ५५१ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद; नदी, ओढ्या, नाल्यांना पूर

आंबेगाव तालुक्यात बुधवारी (ता. २४) पाऊस - १४६ मिलीमीटर व गुरुवारी (ता. २५) पाऊस - ४०५ मिलीमीटर असा एकूण ५५१ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

डी. के. वळसे पाटील

मंचर - आंबेगाव तालुक्यात बुधवारी (ता. २४) पाऊस - १४६ मिलीमीटर व गुरुवारी (ता. २५) पाऊस - ४०५ मिलीमीटर असा एकूण ५५१ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. विशेषतः सातगाव पठार भागात तर पावसाने कहरच केला आहे. जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर वेळ नदीच्या पुलावरून पुराचे पाणी गेले. त्यामळे नव्या पुणे-नाशिक रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली. बटाटा पिकाला हा पाऊस हानिकारक ठरू शकतो. अशी भीती बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेली आठवडाभर आकाशात ढग दाटून येत होते.पण पाऊस हुलकावणी देत होता. जोरदार झालेल्या पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत. वेळ नदीवरील नऊ बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. पेठ गावातील स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे.

'मंचर व अवसरी खुर्द येथे ओढ्या नाल्यांना पूर आले. मंचर नगरपंचायतीमार्फत ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा होऊ नये. म्हणून ओढ्यातील झुडुपे काढण्यास सुरुवात केली आहे.' अशी माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

Dimbhe Dam

'पेठ गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाच टँकरची व्यवस्था होती.पण आत्ता पाण्याचा प्रश्न दूर झाल्याने टँकर बंद होतील. नागरिकांनी स्वच्छ व उकळून थंड करून पाणी प्यावे.याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.'

- संजय पवळे, सरपंच पेठ (ता. आंबेगाव)

'गेली दोन दिवस सातगाव पठार भागात पावसाचा जोर कायम होता.या भागातील शेतकऱ्यांचे बटाटा पिक मुख्य आहे. पावसाने उघडीप न घेतल्यास बटाटा पिकला धोका होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बटाटा पिकातील पाणी चर खोदून काढून देण्यास सुरुवात केली आहे.'

- जयसिंग एरंडे, बटाटा उत्पादक शेतकरी सातगाव पठार (ता. आंबेगाव)

बुधवार (ता.२४) मंडल निहाय मिलीमीटरमध्ये झालेला पाउस :-

डिंभे ५०, घोडेगाव- ३२, मंचर -२९, कळंब -२५, पारगाव- १०.

गुरुवार (ता. २५) : डिंभे -१०४, घोडेगाव-९०, मंचर -७१,कळंब -७३, पारगाव- ६७.

हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा (डिंभे धरण) गुरुवार दुपारपर्यंत पाणीसाठा ५६ टक्के झाला होता. धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढत असल्याचे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले.

गुरुवार झालेला पाऊस - १०४ मिलीमीटर

एकुण पाऊस - ५०६ मिलीमीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT