पुणे : आपत्तीच्या काळातही रुग्णवाहिकांसाठी नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) त्याचे दर निश्चित केले आहे. त्यात पहिल्या 25 किलोमीटरसाठी अथवा दोन तासांसाठी वाहनांच्या प्रकारानुसार 500 ते 900 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. या पेक्षा जास्त पैसे कोणीही घेतल्यास त्यांच्यावर आपत्तकालीन कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रुग्णवाहिकांसाठी अवाजवी पैसे घेतले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याची आरटीएने दखल घेतली आहे. त्यानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच या दराची माहिती रुग्णवाहिकेत दर्शनी भागात लावण्याचे बंधन करण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त दराने पैसे घेतले गेल्यास संबंधितांवर आरटीआे कार्यालयाकडून फौजदारी कारवाई होणार आहे. हे दर शहरातील सर्व रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांनाही लागू असतील. तसेच पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात रुग्णवाहिका म्हणून नोंद झालेल्या प्रत्येक रुग्णवाहिकेला याच दराने पैसे आकारता येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे शहरात 1366, पिंपरी चिंचवडमध्ये 1797 आणि जिल्ह्यात 152, अशा एकूण 3315 रुग्णवाहिका पुणे जिल्ह्यात आहेत.
- मारुती व्हॅन - 25 किलोमीटर अथवा दोन तासांसाठी 500 रुपये- त्यानंतर प्रती किलोमीटर 11 रुपये- वेटिंग चार्ज प्रती तास 100 रुपये
- टाटा सुमो, मॅटेडोर आदी- 25 किलोमीटर अथवा दोन तासांसाठी 600 रुपये- त्यानंतर प्रती किलोमीटर - 12 रुपये - वेटिंग चार्ज प्रती तास 125 रुपये
- टाटा 407, स्वराज माझदा आदी- 25 किलोमीटर अथवा दोन तासांसाठी 900 रुपये - त्यानंतर प्रती किलोमीटर- 13 रुपये - वेटिंग चार्ज प्रती तास 150 रुपये
हे दर संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू असतील. अंतर 25 किलोमीटरपेक्षा जास्त झाल्यास पुढील किलोमीटरसाठी प्रती किलोमीटरनुसार दर आकारणी करायची आहे. रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस हे दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी तातडीने करायची आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. प्रत्येक रुग्णवाहिकेत जीपीएस प्रणाली असावी, असेही बंधन त्यांना घालण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांनाही या बाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रुग्णवाहिकेच्या प्रत्येक फेरीनंतर तिचे निर्जुंतुकीकरण करायचे आहे. चालकाला कोणतेही वेगळे पैसे द्यायचे नाहीत. तसेच परतीच्या प्रवासासाठीचे शुल्क यामध्ये गृहित धरले आहे, असेही भोर यांनी स्पष्ट केले. वातानुकूल रुग्णवाहिकांसाठी वेगळे शुल्क आकारता येणार नाही. तसेच या दरपत्रकाची माहिती रुग्णालयांनीही दर्शनी भागात लावायची आहे. कोणत्याही रुग्णवाहिकाचालकाने जादा दर आकारणी केल्यास त्याची तक्रार नागरिकांनी आरटीआे कार्यालयात केल्यास त्याच्याविरुद्ध तत्काळ फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही भोर यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.