Accident sakal
पुणे

Accident : रुग्णवाहिका ट्रकवर आदळून रुग्णाचा मृत्यू, चारजण जखमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भरधाव रुग्णवाहिका ट्रकवर पाठीमागून आदळल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक गंभीर जखमी झाला असून, मुलाचे तिघे नातेवाईक किरकोळ जखमी झाले आहेत. आंबेगाव बुद्रूक परिसरात जांभूळवाडी रस्त्यावरील दरी पुलाजवळ बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

किरण अंकुश अवताडे (रा. लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. रुग्णवाहिका चालक सद्दाम सुतार हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अनिता अवताडे, अंकुश अवताडे आणि सुखदेव अवताडे हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालक नितीन मधुकर गवते (वय ३६, रा. भोंडवे चाळ, पुनावळे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवताडे कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहेत. त्यांनी किरणला सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अवताडे कुटुंबीय किरणला रुग्णवाहिकेतून मुंबईला घेऊन जात होते.

मध्यरात्री दरी पुलाजवळ रुग्णवाहिका चालकाने मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात किरणचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Candidates: मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्यात राज ठाकरेंचे दोन उमेदवार देणार कडवी झुंज! नावे जाहीर

Ganesh Naik : संदीप नाईक तुतारी फुंकणार? उमेदवारी जाहीर होऊनही गणेश नाईकांची नाराजी

Latest Maharashtra News Updates : शिवसेना उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

Ranji Trophy 2024: Cheteshwar Pujara चे १८वी डबल सेंच्युरी! हर्बट शटक्लिफ अन् मार्क रामप्रकाश यांचा विक्रम मोडला

CJI Chandrachud: सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सपाच्या खासदाराकडून शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT