American Senior Citizen Bike Riders sakal
पुणे

American Bike Riders : अमेरिकन जेष्ठ नागरिक बाईक रायडर्सची भारत भ्रमंती

भारत भ्रमंती करिता 29 जानेवारीपासून भारतातील सहा विविध राज्यात अमेरिकन ज्येष्ठ नागरिक बाईक रायडर्सने प्रवास सुरू केला आहे.

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट - वयाच्या साठीनंतर हाडे ठिसूळ होणे, सांध्यांचे दुखणे वाढणे तसेच तत्सम आजाराला बळी पडताना आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा समस्या आ वासून उभ्या आहेत. दरम्यान एका कार्यक्रमाप्रसंगी 'दिल जवान होना चाहिये, उमरान बीच की रखेया' असे आपुसक शब्द या ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून पंजाबी भाषेत मुखातून बाहेर पडताना दिसले.

भारत भ्रमंती करिता 29 जानेवारीपासून भारतातील सहा विविध राज्यात अमेरिकन ज्येष्ठ नागरिक बाईक रायडर्सने प्रवास सुरू केला आहे. या उपक्रमात सुमारे 24 अमेरिकन जेष्ठ नागरिकांसह काही भारतीय नागरिकांचा ही समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये वय वर्षे 70 ते 75 पुढील असलेल्या सहा महिलांचा यात विशेष सहभाग होता. यावेळी उपक्रमाची सुरुवात त्यांनी नाशिक येथून केली.

पुढे औरंगाबाद, नागपूर, कान्हा, नॅशनल पार्क, सांची, आग्रा, जयपुर, बिकानेर, जैसलमेर, जोधपुर, उदयपूर, पालनपुर, ढोलवीरा, सापुतारा, पुणे येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देत हा प्रवास करण्यात आला. यावेळी पुण्यातून ते मार्गस्थ झाले असून यावेळी गोवा येथे ही भ्रमंती थांबणार आहे.

त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच पुण्यात द पंजाबी कल्चर असोसिएशनच्या वतीने त्यांचे जल्लोषात वाजत, नाचत, गाजत भांगडा स्टाईलने स्वागत करण्यात आले. तसेच विविध मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले.

यावेळी असोसिएशनच्या वतीने या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देत सन्मान व कौतुक करण्यात आले. प्रसंगी भारतीय लोकांचे प्रेम व आपुलकी पाहून अमेरिकन ज्येष्ठ नागरिक आनंदाने भारावून गेले होते.

कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशनचे अध्यक्ष नागनाथ पाल यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष अशोक अग्रवाल, उपाध्यक्ष अरुण चोप्रा, सचिव सुभाष कोहली, खजिनदार विरमित सिंग मैंनी, कार्यक्रमाचे समन्वयक विनोद बजाज आदी उद्योजक, व्यापारी वर्ग व असोसिएशनचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jet Airways: आता जेट एअरवेज होणार इतिहासजमा; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar: मविआकडून महिलांसाठी दरमहा 3,000 रुपयांची घोषणा, अजितदादा खवळले; संपूर्ण हिशोबच मांडला

WPL 2025 Retention list: स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर यांचा फैसला झाला; MI, RCB सह ५ संघांनी जाहीर केली रिटेन लिस्ट

Maharashtra Cyber Department: “गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण करणारे टी-शर्ट विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मविरुद्ध FIR नोंदवला”

अली फझल आणि रिचा चड्ढाने अखेर उघड केलं लेकीचं नाव ; नावाचा अर्थ ऐकून व्हाल चकित !

SCROLL FOR NEXT