Amit Shah Sakal
पुणे

Amit Shah: अमित शहांनी ज्या CRCS डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केले त्याचा सहकार क्षेत्राला असा होणार फायदा

Amit Shah Pune Visit: गृहमंत्री अमित शहांनी CRCS डिजिटल पोर्टलचे आज उद्घाटन केले.

राहुल शेळके

Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर चारच दिवसांनी अमित शाह पुण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालयाचे डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' संकल्पनेवर दृढ विश्वास व्यक्त करत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

सहकार क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाचे डिजिटलाइजेशन करण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये संपूर्णपणे पेपरलेस प्रणाली लागू करणे, मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा (MSCS) आणि सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रण करणे, व्यवसायात सुलभता वाढवणे, डिजिटल कम्युनिकेशन सक्षम करणे या सारख्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

देशात 1,550 हून अधिक नोंदणीकृत बहु-राज्य सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज सुलभ व्हावे म्हणून हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT