Amol Kolhe  sakal
पुणे

Amol Kolhe : भाकरी फिरवा, परिवर्तन घडवा;कोल्हे,‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता काहीजण घरवापसी करत आहेत; पण याची आता गरज काय? असा प्रश्‍न अडचणीच्या काळात काबाडकष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. पक्ष सोडून जाणारे चूक सुधारतील; पण त्यांच्यामुळे कार्यकर्त्यांना किती दगडं खावी लागली याचा विचार होणार की नाही?’’ असा थेट सवाल करून कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार व्हावा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नमूद केले. तरुण व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश असून यंदा विधानसभेत भाकरी फिरवा, परिवर्तन घडवा असे आवाहनही केले.

खासदार कोल्हे यांच्या संसदेतील भाषणांचे ‘संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी कोल्हे यांची मुलाखत घेतली. कोल्हे यांनी अभिनय, राजकारण, लोकसभा मतदारसंघातील जनसंपर्क, विरोधकांकडून केली जाणारी टीका यावर रोखठोक उत्तर दिले. यावेळी माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार डॉ. कुमार केतकर, मानवाधिकार कार्यकर्ते ॲड. असीम सरोदे, ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, ‘‘पक्ष सोडून गेलेले काहीजण परत येत असले; तरी त्यांची गरज काय? हे माझे वैयक्तिक मत आहे. पक्ष प्रवेशाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो पक्षश्रेष्ठी घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे आरोप करत होते; पण सध्या आमचा पक्ष सर्वांत स्वच्छ असून ज्यांच्यावर आक्षेप होते, ते आमच्याबरोबर नाहीत. सन १९९९ला पक्ष स्थापन केल्यानंतर १५ वर्षे आम्ही सत्तेत होतो. शरद पवारांनी अनेकांना मोठे केले. सन २०१४ व २०१९मध्ये अनेकजण सोडून गेल्याने संघर्ष करावा लागला. गेल्यावर्षी पक्ष फुटल्यानंतर अनेकजण गेले. मागच्या रांगेमध्ये असलेले कार्यकर्ते पुढच्या रांगेत आले आहेत. पक्षात नवीन केडर तयार झाले आहे, त्यांना मोठी संधी आहे.

पक्षफुटीमुळे लोकसभा निवडणुकीत आव्हान असले, तरी माझा मतदारसंघ सोडून मी अन्य ठिकाणी प्रचार सभा घेण्यासाठी गेलो. त्याचा मला फायदा झाला. माझी जागा सुरक्षीत आहे, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेल्याने त्यांचा आत्मविश्‍वास निर्माण झाला. काठावरच्या मतदारांनाही माझा विजय होतो, असे वाटत असल्याने त्यांची मते फिरवण्यात यश आले. शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा विचार न करता लोकसभेला मेहनत घेतली, त्यांचे कष्ट बघूनच निडरपणे निवडणूक लढवली. ही निवडणूक आमच्यासाठी ‘करो या मरो’ अशी होती, त्यात आम्ही विरोधकांवर तुटून पडलो, मतदारांनी आम्हाला साथ दिली.’’

यावेळी हिंदीतील भाषणांचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रज्ञा पोवळे यांनी मनोगत व्यक्त केले. फडणीस यांनी प्रास्ताविक केले. अश्‍विनी डोके सावत यांनी सूत्रसंचालन केले.

‘स्वतः भाषण लिहिण्याची सवय’

शाळेतील वक्तृत्व स्पर्धेसाठी मला स्वतःला भाषण लिहिण्याची सवय वडील आणि शिक्षकांनी लावली. तीच सवय संसदेतील भाषणासाठीही कायम असून मी स्वतः अभ्यास करून भाषण देतो. हे भाषण करताना देश, राज्य आणि मतदारसंघाचा विचार केलेला असतो. ज्या मतदारांनी मला संसदेत पाठवले आहे, त्यांच्यासाठी मी बोलतोय याची जाणीव ठेवली जाते. संसदेत मी काय बोलावे, काय बोलू नये? यावर माझ्या पक्षाने कधीही बंधन घातले नाही, असे कोल्हे यांनी सांगितले.

केतकर म्हणाले...

रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांविरुद्ध अणुबॉम्ब वापराचा दिलेला इशारा, इस्राईलकडून गाझापट्टीचा होणारा नरसंहार ही परिस्थिती तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जात आहे.

खासदारांची संसदेतील भाषणेदेखील चिंतनशील असावीत.

नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कायदे बदलणे, पक्ष फोडणे अशा गोष्टी केल्या.

२०२९च्या निवडणुकीपूर्वी २०२७ला नरेंद्र मोदी राष्ट्रपती होऊ शकतात, त्यामुळे विरोधकांना २०३२ पर्यंत काहीच करता येणार नाही.

अमेरिका, युरोप, इस्राईलसह जगभरातील उजव्या विचारसरणीच्या कटाचे मोदी प्रतिनिधित्व करतात.

सरोदे म्हणाले...

अमोल कोल्हे यांनी सामाजिक परिवर्तनाची कास धरून संसदेत शेतकरी, तरुण, महिलांचे प्रश्‍न मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांनी केवळ अभिनय केला नाही; तर त्यांचे विचार कृतीतून दिसून येतात.

शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस परत मिळणार हे कायदा सांगतो, तसा निर्णय न झाल्यास काहीतरी गडबड आहे.

पक्ष पळविणे, भ्रष्टाचार लोकांना आवडत नाही, हे लोकांच्या डोळ्यात खुपत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लाट आहे, त्याचा फायदा कसा घ्यायचा हे बघितले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT