पुणे- अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये संध्या जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील मनसे प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे यांनी उमेश पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. उमेश पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. बायकोची नोकरी वाचवण्यासाठी अजित पवारांची चाकरी करणारा म्हणत उमेश पाटील यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे.
"ज्यांच्या लाचखोर बायकोची सरकार गेलं की चौकशी लागते आणि सरकार आलं की क्लीन चिट मिळते, अशा बायकोची नोकरी वाचवण्यासाठी अजित पवारांची चाकरी करणाऱ्या उमेश पाटील यांनी सन्माननीय राज साहेबांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावे. अन्यथा मनसैनिक सोलापूर मधल्या नरखेड गावी येऊन त्याची जागा दाखवतील" अशी पोस्ट किशोर शिंदे यांनी केली आहे.
अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी राज ठाकरे यांना ताब्यात घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वातावरण तापलं आहे.
राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवार यांना टोला लगावला होता. उपमुख्यमंत्री नसताना पुण्याची धरणं वाहतात असं ते म्हणाले होते. यावरून अजित पवार गटामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. सुपारीबाज माणसाने दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांवर बोलू नये, असं ते म्हणाले होते.
राज ठाकरे यांच्यावरील अमोल मिटकरींची टीका मनसैनिकांना जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच अमोल मिटकरी यांची कार फोडण्यात आली आहे. सुदैवाने अमोल मिटकरी हे कारमध्ये नव्हते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरी यांना तुटवण्याची भाषा केली आहे. अमोल मिटकरी जिथे दिसतील तिथे तुटवा नाहीतर पदमुक्त करेन असा इशारा पदाधिकारी करत आहेत. अमोल मिटकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.