मंचर - 'जून 2020 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारी (ता. २५) रोजी झालेल्या बैठकीत या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणूनमदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे पंधरा कोटी ४८ लाख रुपये रक्कम मंजूर झाली आहे. सदर बैठकीत महायुती सरकारच्या वतीने विशेष बाब म्हणून याची दखल घेण्यात आली असून, एकूण पाच हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे'. अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली..
ते म्हणाले', या नुकसानभरपाईच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून संबंधित शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत होती. त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, आपण सातत्याने पाठपुरावा केला असून, आज त्या प्रयत्नांना यश आले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार"
दरम्यान हिरडा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून सुरुवातीला उपोषण व त्यानंतर धरणे आंदोलन किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे यांचे नेतृत्वाखाली मंचर येथे प्रांत कार्यालयासमोर सुरू होते. मंत्रिमंडळाने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकार, वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेकांचे या कामी सहकार्य मिळाले' असे वाघमारे यांनी सांगितले.
हिरडा उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याचानिर्णय घेतल्यानंतर आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरमारे, संजय गवारी, प्रकाशराव घोलप यांच्यासह किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा केला. आंबेगाव जुन्नर तालुक्यातील 65 गावातील सात हजार 66 क्विंटल हिरड्याचेनुकसान झाले होते. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनानुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे' असे संजय गवारीयांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.