Crime 
पुणे

अमरावतीच्या नगररचना विभागाच्या सहसंचालकांच्या पत्नीला अटक; बिल्डरची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे - लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या अमरावतीच्या नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझिरकर यांची पत्नी संगीता नाझिरकर यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्यांची तीन ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संगीता नाझिरकर यांच्यासह नऊ जणांनी बांधकाम प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रांद्वारे भागीदार बनवून एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय 44, रा. बारामती) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार संगीता हनुमंत नाझिरकर, चंद्रकांत गरड, दिलीप कास्टीया, देवेश जैन, रवींद्र जैन, समीर जैन, राजेंद्र ओसवाल, ऋषभ ओसवाल, सय्यद सुलतान इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोरटे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा जमीन खरेदी-विक्री, विकसनाचा व्यवसाय आहे. ते व त्यांचे नातेवाईक मधुकर भरणे यांनी भागीदारीमध्ये ओम साई डेव्हलपर्स नावाची कंपनी सुरू केली. त्यामध्ये चंद्रकांत गरड आणि संगीता यांना भागीदार करून घेतले आहे. त्यानंतर संगीता नाझिरकर व गरड यांनी संगनमत करून, कट रचून फिर्यादी यांनी आर्थिक नुकसान व्हावे आणि त्यांना आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.

नाझिरकर आणि इतर आरोपींचे ओम साई डेव्हलपर्स या फर्ममधील बॅंक खात्यांची माहिती तपासून घ्यायची आहे. गुन्ह्यात वापरलेली बनावट कागदपत्रे जमा करायचे आहेत. तसेच ते कोणत्या ठिकाणाहून बनवून घेतली याचा तपास करायचा असल्याने आरोपीला कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने संगीता नाझिरकर यांची तीन ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT