Andhra-Dam 
पुणे

‘आंद्रा’ची पाणीपट्टी १०० कोटी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आंद्रा धरणातून शहरासाठी ३६.८७ दशलक्ष घनमीटर वार्षिक पाणी कोटा मंजूर झाला आहे. त्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपये पाच टप्प्यात महापालिकेने पाटबंधारे विभागाला द्यायचे आहेत. त्याचा २० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे. शिवाय, या प्रकल्पाच्या अनुषंगाने महापालिकेने वेगवेगळ्या भागात पाण्याच्या टाक्‍या बांधण्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. 

महापालिका सध्या शहरासाठी पवना धरणातून पाणी घेत आहे. त्यासाठी रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा केला जात आहे. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची मागणी आणि भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन पाण्याचे नवीन स्त्रोत शोधण्यात आले. त्याअंतर्गत भामा आसखेड धरणातून प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर आणि आंद्रा धरणातून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर पाणी घेण्याचे नियोजन आहे.

दीड वर्षांपूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारने आंद्रा धरणातून प्रतिवर्षी ३६.८७ दशलक्ष घनमीटरचा पाणीकोटा मंजूर केलेला आहे. या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाला महापालिकेने सुमारे शंभर कोटी रुपये पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने द्यायचे आहेत. त्याचा सुमारे २० कोटी रुपयांचा दुसरा हप्ता या महिना अखेरपर्यंत द्यायचा आहे. त्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. तसेच, या योजनेसाठी महापालिका अर्थसंकल्पात ‘पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ या नावाने तरतूद केलेली आहे. त्याअंतर्गत पाण्याचा अतिरिक्त स्त्रोत निश्‍चित करणे, त्यातील पाणीसाठा आरक्षित करणे व त्या अनुषंगाने कामे करण्यात येणार आहेत. 

टाक्‍या बांधणार
आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीतून देहू-तळवडेपर्यंत आणले जाणार आहे. तेथील बंधाऱ्यातून पाणी उचलून चऱ्होलीतील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. पाणी वितरणासाठी वेगवेगळ्या भागात २७ पाण्याच्या टाक्‍या उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT