girish mahajan and anil deshmukh sakal
पुणे

Pune News : गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी अनिल देशमुखांचा एसीपींवर दबाव; सीबीआयच्या तपासातून समोर आली माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जळगावमधील ‘मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेतील वर्चस्वाबाबत झालेल्या वादात भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त (एसीपींवर) प्रवीण मुंडे यांच्यावर दबाव आणला असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या तपासातून पुढे आले आहे.

जळगावमधील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी महाजन आणि इतरांनी धमकी देत अपहरण केले आणि खंडणी उकळल्याचा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाजन, रामेश्‍वर नाईक, नीलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर गुन्हा दाखल आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर मोक्कानुसार कारवार्इ करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात चौकशी सुरू केली होती. त्याचा अहवाल नुकताच येथील मोक्का न्यायालयात विशेष न्यायाधीश (मोक्का) पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यात या सर्व बाबी नमूद आहे.

काय आहे प्रकरण -

संस्थेचा ताबा गिरीश महाजनांना हवा आहे. त्यासाठी ते एक कोटी रुपये द्यायला तयार आहेत. मात्र, ॲड. पाटील यांनी नकार दिल्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हे प्रकरण कोथरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. याच प्रकरणात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे १२५ तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले होते. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे वर्ग झाले होते.

अहवालात नेमके काय नमूद आहे -

गुन्हा दाखल होण्याच्या एक महिना आधी देशमुख यांनी मुंढे यांना फोन करून सांगितले की, गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने ॲड. चव्हाण तुमच्याकडे येतील व ते घटनेची माहिती देतील. त्‍यानंतर ॲड. चव्हाण हे मुंढे यांना भेटले व देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार पाटील यांची तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले.

मात्र प्रकरण पुण्यातील असल्याने मुंढे यांनी ॲड. पाटील यांना कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले होते. गुन्हा दाखल न झाल्याने देखमुख यांनी पुन्हा मुंढे यांना फोन करून तक्रार नोंदविण्याची सूचना केली. त्यावर मुंढे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, या गुन्ह्याची हद्द पुण्यात आले. त्यामुळे तिकडे गुन्हा नोंदवायला हवा.

मात्र तरीही गुन्हा दाखल न केल्याने देखमुख यांनी चिडून तिसऱ्यांदा मुंढे यांना फोन केला व धमकीच्या स्वरात मुंढे यांना म्हणाले की, एक गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांनी तीनदा फोन करण्याची आवश्यकता का आहे? गृहमंत्र्यांच्या दबावामुळे अखेर जानेवारी २०१८ मध्ये याबाबत जळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर तो कोथरूड पोलिसांकडे वर्ग झाला, असे सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या तपास अहवालात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT