Flex ravindra Dhangekar 
पुणे

Kasba Bypoll Election : कसब्यातील गोंधळ थांबेना! रवींद्र धंगेकरांवर आणखी एक गुन्हा; कारण...

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना पैसे वाटपाचा आरोप करत उपोषण पुकारलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आज धंगेकरांवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या फ्लेक्सवरुन थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाधीच पुण्यातील वडगाव भागात धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. याविरोधात पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने तक्रार दिल्यानंतर आता पोलिसात याप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात राहुल मानकर आणि अतुल नाईक यांच्या विरोधात शहर विद्रूपीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT