डॉ. सायरस पुनावाला sakal
पुणे

कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोस आवश्यक; सायरस पुनावाला

कोव्हिशिल्डच्या दोन्ही डोसनंतरही शरीरातील कोरोनाविरूद्धची प्रतिपींडे (ॲन्टीबॉडी) कमी होत

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

कोव्हिशिल्डच्या (covishield)दोन्ही डोसनंतरही (Dose) शरीरातील कोरोनाविरूद्धची प्रतिपींडे (ॲन्टीबॉडी) कमी होत असल्याचे ‘लान्सेट’च्या शोधनिबंधातून स्पष्ट होते. लोकांनी तिसरा डोस घ्यावा का ?, असा प्रश्न सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संस्थापक डॉ. सायरस पूनावाला (cyrus poonawalla) यांना विचारला असता, त्यांनी स्पष्टपणे, मी स्वतः कोव्हिशिल्डच्या (covishield) दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घेतला असून, सिरमच्या कर्मचाऱ्यांनाही(Worker) दिला असल्याचे सांगितले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. पूनावाला यांना यावेळी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, टिळक स्मारक मंदिराचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीतांजली टिळक आदी उपस्थित होते. लोकांनीही कोव्हिशिल्डचा दूसरा डोस झाल्यानंतर सहा महिन्यांनी तिसरा बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही पूनावाला यांनी या पत्रकार परिषदेत केले. पुरस्कार कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले,जगभरात किफायतशीर दरात लस देत डॉ. पूनावाला यांनी लोकमान्यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे पुण्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्याचा आम्हाला अभिमान आहे. यापुरस्काराच्या माध्यमातून आम्ही डॉ.पूनावाला यांचे आभार मानत आहोत.’’ डॉ. दीपक टिळक यांनी यावेळी लोकमान्यांच्या जीवनातील दुर्मिळ प्रसंग आणि राष्ट्रीय नेते म्हणून असलेल्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.

मोदींचे कौतुक आणि टीका

सिरमचा आजवरचा प्रवास खूप खडतर आणि वेदनादायी राहिला आहे. पूर्वी परवानग्या मिळण्यासाठी जाच सहन कराला लागायचा. अन्न व औषध प्रशासनाकडून पूर्वी मोठ्या प्रमाणावर लालफितीचा कारभार केला जात होता. मात्र मोदींच्या काळात नोकरशाहीची चहा कॉफीची पद्धत बंद झाल्यामुळे त्यांचा त्रास ही कमी झाला आहे. त्यामुळे आता तातडीने एफडीएकडून परवानगी मिळते. म्हणूनच आम्ही कोविशिल्ड वेळेवर बाजारात आणू शकलो, असे उत्तर डॉ. पूनावाला यांनी दिले.

तर पुण्यात सर्वाधिक रूग्णसंख्या असताना लशींचा तुटवडा का? असा प्रश्न विचारले असता. डॉ. पुनावाला म्हणाले,‘‘पुण्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता आम्ही मोदी सरकारकडे या बद्दल विचारणा केली होती. पण त्यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही.’’

कुटुंबाने नफ्याचा त्याग केला

परदेशातल्या कंपनीची लस जिथे दुप्पट किमतीला भेटते. तीच लस सिरम कमी किमतीत जगभरात उपलब्ध करून देते. जगात सर्वात स्वस्त कोरोनाची लस सिरम उपलब्ध करते. मी जर आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे विकले असते. तर माझ्या उत्पन्नात खूप भर पडली असती पण आम्ही खूप कमी किमतीत लस दिली आहे. माझ्या कुटुंबाने नफ्याचा त्याग केला आहे. भविष्यातही माझा मुलगा आदर ही परंपरा कायम ठेवेल असा विश्वास वाटत असल्याचे डॉ. पूनावाला यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT