Apmc Election Result, baramati  sakal
पुणे

Apmc Election Result : अजित पवारांची व्युव्हरचना यशस्वी ! नवीन चेहरे देऊनही राष्ट्रवादीने मिळवले वर्चस्व

मिलिंद संगई, बारामती

बारामती - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला.

यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलने राष्ट्रवादी पुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, प्रत्यक्षात मात्र भाजपच्या सर्व उमेदवारांना किरकोळ मते मिळाल्याने राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय झाला.

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे आज (ता.29) मतमोजणीला सकाळी प्रारंभ झाला. त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातच या मतदानाचा कल लक्षात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली होती. स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी निवडणुकीत बारकाईने लक्ष घालून व्युव्हरचना केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दणदणीत मात करीत विजय प्राप्त केला.

भाजप पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांनी देखील मतदारांकडे गाठीभेटी घेत बदल घडविण्याची विनंती केली होती मात्र मतदारांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलवर विश्वास व्यक्त करीत त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केले.

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू..

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत रयत पॅनेलवर मतदारांनी जो विश्वास दाखविला, माझ्या आवाहनाला जो प्रतिसाद दिला, तो विश्वास माझे सर्व नवनिर्वाचित सहकारी सार्थ ठरवून दाखवतील. दोन वगळता सर्वच नवीन चेहरे असल्याने ते जोमाने काम करतील. बाजार समितीचे कामकाज अधिक प्रभावी कसे होईल, याचाच आमचा प्रयत्न असेल.- अजित पवार, विरोधी पक्षनेते.

बाजार समितीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे

कृषी पतसंस्था सर्वसाधारण- विनायक महादेव गावडे (1178), सतीश सर्जेराव जगताप (1141), रामचंद्र शामराव खलाटे (1153), बापूराव दौलतराव कोकरे (1166), दयाराम सदाशिव महाडीक (1148), सुनिल वसंतराव पवार (1131), दत्तात्रय शंकरराव तावरे (1116),

कृषी पतसंस्था महिला- शोभा विलास कदम (1211), प्रतिभा दिलीप परकाळे (1233), कृषी पतसंस्था भटक्या विमुक्त जाती जमाती- शुभम प्रताप ठोंबरे (1210), कृषी पतसंस्था इतर मागासवर्ग – नीलेश भगवान लडकत हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

ग्रामपंचायत सर्वसाधारण- विशाल ज्ञानदेव भोंडवे (430), विश्वास तानाजी आटोळे (424), ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल- युवराज कैलास देवकाते (437), ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती- अरुण गणपत सकट (451), व्यापारी व आडते- मिलिंद अशोक सालपे (220) व संतोष पांडुरंग आटोळे (204), हमाल व तोलारी- नितीन शंकर सरक (141)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT