Apoorva Alatkar Pune Metro esakal
पुणे

Pune Metro : साताऱ्याच्या पोरीनं PM मोदींसमोर चालवली Metro! दडपण, काहूर, अपेक्षांचं ओझं पण..

अपूर्वा अलाटकर झाली लोकोपायलट; वनाझ ते रूबी क्‍लिनिक मार्गाची जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

दडपण, मनातील काहूर, सगळ्यांच्‍या अपेक्षांचे ओझे सांभाळत लोकोपायलट अपूर्वाने अपेक्षित स्थानक गाठले.

सातारा : गतिमान जगाशी वेळेची सांगड घालण्‍यासाठी पारंपरिक रेल्‍वेसेवेला समांतर अशी वेगवान मेट्रो देशासह राज्‍याच्‍या विविध भागांत विस्‍तारत आहे. या मेट्रोने (Metro Train) अत्‍यंत वेगाने विस्‍तारणाऱ्या पुण्‍याला आपल्‍या कवेत घेण्‍यास सुरुवात केली आहे.

त्‍या सेवेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्‍ते नुकतीच झाली. या सेवेदरम्‍यान आपल्‍यातील कौशल्‍याची चुणूक दाखविण्‍याची संधी साताऱ्याची कन्‍या असणाऱ्या अपूर्वा प्रमोद अलाटकर हिला मिळाली. मेट्रोची ‘मास्‍क ऑन की’च्‍या साथीने लोकोपायलट अपूर्वाने सर्व तांत्रिक बाबींच्‍या मदतीने वनाझ येथून उद्‌घाटनाची फेरी पूर्ण केली.

शाहूपुरीतील रांगोळे कॉलनीत अपूर्वा अलाटकर (Apoorva Alatkar) राहते. प्रमोद आणि उज्ज्‍वला यांची ती कन्‍या. प्रमोद अलाटकर हे ‘सकाळ’ समूहाच्‍या सातारा कार्यालयात नोकरीस आहेत. अपूर्वाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर शाळेत झाले. यानंतर तिने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले.

दहावीनंतर तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. येथील शिक्षण संपवून साताऱ्यात परतल्‍यानंतर तिने सज्‍जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्‍ये त्‍याच शाखेतील पदव्‍युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर तिला पुणे येथील कल्‍याणी उद्योग समूहात नोकरीची संधी मिळाली.

तेथे काम सुरू असतानाच कोरोनाचा कहर वाढला आणि लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर ती साताऱ्यात परतली. २०१९ मध्‍ये पुणे मेट्रोसाठीच्‍या विविध पदांसाठीची माहिती तिला मिळाली. त्यानुसार तिने अर्ज केला. अर्ज केल्‍यानंतर अपूर्वाला पहिल्‍या फेरीसाठी मेट्रोकडून बोलावण्‍यात आले. पहिली, दुसरी व तिसऱ्या फेरीतील सर्व निकष, कठीण पातळ्या पूर्ण करत फेब्रुवारी २०२३ मध्‍ये अपूर्वाने मेट्रोतील सेवेत आपले स्‍थान पक्के केले.

निवडीनंतर तिच्‍याकडे वनाझ स्‍थानकाच्‍या स्‍टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी सोपविण्‍यात आली. मेट्रोच्‍या वतीने पुण्‍यात चार मार्गांच्‍या विस्‍तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्‍यानंतर त्‍या मार्गांच्‍या लोकार्पणाची तयारी प्रशासनाने सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते लोकार्पण करण्‍याचे ठरल्‍यानंतर चारही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो चालविण्‍यासाठीचे आवश्‍‍यक प्रशिक्षण सुरू केले.

या प्रशिक्षणार्थींमध्‍ये अपूर्वाचा देखील समावेश होता. हे ४५ दिवसांचे खडतर तांत्रिक प्रशिक्षण तिने पूर्ण केले. ठरल्‍याप्रमाणे काल या सेवेच्‍या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी पुण्‍यात आले. मेट्रोची सर्व सज्‍जता झाली होती. नियोजनानुसार अपूर्वा वनाझ येथील मेट्रोत ‘मास्‍क ऑन की’सह सज्‍ज होती. श्री. मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि अपूर्वाने ‘मास्‍क ऑन की’चा वापर करत मेट्रो रूबी क्‍लिनिककडे मार्गस्‍थ केली.

दडपण, मनातील काहूर, सगळ्यांच्‍या अपेक्षांचे ओझे सांभाळत लोकोपायलट अपूर्वाने अपेक्षित स्थानक गाठले. प्रवासात एटीपी (ॲटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्‍शन), टीबीसीच्‍या (ट्रॅक्‍शन ब्रेक कंट्रोलर) तांत्रिक बाबी तसेच कंट्रोलरच्‍या सूचनांचे पालन करत पुन्‍हा वनाझ स्‍टेशन गाठले. जबाबदारी आणि सर्वांच्‍या खिळलेल्‍या नजरांना आश्‍‍वासकपणे सांभाळत अपूर्वाने यशस्‍वी लोकोपायलट होण्‍याचा मान मिळवला.

याबाबत तिने शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर चांगल्‍या संधीच्‍या शोधात होते, ती संधी मेट्रोमुळे मिळाली. माझ्‍याकडे मेट्रोची स्‍टेशन कंट्रोलर आणि ट्रेन ऑपरेटर अशी दुहेरी जबाबदारी होती; पण दुसऱ्या जबाबदारीकडे जाण्‍याकडे संधी काल मला मिळाली. मेट्रो चालवायची संधी मिळेल, असे स्‍वप्‍नातही वाटत नव्‍हते. या संधीचे सोने करण्‍याचा मान मला मिळाला. यासाठी सर्वांचे पाठबळ, आशीर्वाद कामी आल्‍याचे तिने सांगितले.

शिक्षण घेतानाच अपूर्वाला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्‍याचा ध्‍यास होता. यासाठी तिने स्‍वत:ला नेहमी अभ्‍यासात गुंतवून घेतले. शिक्षणादरम्‍यान, तिने कोणत्‍याही गोष्‍टीचा हट्ट केला नाही. जे करायचे ते वेगळेच, अशी ती नेहमी म्‍हणायची आणि तिने ते करूनही दाखवले. वडील म्‍हणून तिच्‍याकडून असणाऱ्या अपेक्षा तिने पूर्ण केल्‍या. कुटुंबाबरोबरच साताऱ्याचे नाव तिने उंचावले.

- प्रमोद अलाटकर, सातारा.

पहिल्‍यापासूनच अपूर्वाने अभ्‍यासाला वाहून घेतले होते. वेगळे करण्‍याचा ध्‍यास तिला होता. यासाठी वाटेल ते कष्‍ट करण्याची तिची तयारी असायची. तिने तसेच आम्‍ही घेतलेल्‍या कष्‍टाचे सार्थक झाले. तिने मेट्रो चालवली, याचा खूप आनंद झाला, कौतुक वाटले.

- उज्ज्‍वला अलाटकर, सातारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT