12th Supplementary Examination esakal
पुणे

12th Supplementary Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 'या' दिवशी होणार सुरू

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (ता. २७) सुरू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (ता. २७) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरण्यात यावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेस (12th Supplementary Examination) पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, आयटीआय विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी नियमित शुल्कासह २७ मे ते ७ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

त्यानंतर ८ ते १२ जून दरम्यान विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी ३१ मे ते १५ जून पर्यंतचा कालावधी दिला आहे. तर, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या १८ जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे द्यायच्या आहेत.

पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येणार आहे. तसेच, श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार फेब्रुवारी-मार्च २०२४ मधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहणार आहेत.

सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बॅंकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

High Court : ... तर तरुणाईचे आयुष्य होणार उद्ध्वस्त, उच्च न्यायालय : तस्करीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT