11th Admission esakal
पुणे

11th Admission : अकरावीच्या प्रवेशासाठी शुक्रवारपासून करा अर्ज

यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या राबविण्यात येणार आहेत

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे. या दिवसापासून विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रमाणित करून घेण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये राज्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमार्फत होणार आहेत. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी ‘मॉक डेमो नोंदणी अंतर्गत बुधवार (ता. २२) आणि गुरुवारी (ता. २३) डमी अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थी-पालकांना करता येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रवेशाची पहिली विशेष फेरी झाल्यानंतर महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करता येणार आहेत, अशी माहिती इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव आणि प्रभारी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. ज्योती परिहार यांनी दिली.

विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणींना सामोरे जावे लागू नये, तसेच अर्ज भरण्याचा सराव करता यावा, यासाठी ‘मॉक डेमो’ नोंदणीद्वारे पोर्टलवर डमी लॉगिन सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरवात होण्यापूर्वी ही माहिती नष्ट करून शुक्रवारपासून (ता.२४) पोर्टलवर प्रत्यक्षात अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रवेश प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे :

कार्यवाहीचे टप्पे : कालावधी

- विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणी करणे, अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित करून घेणे : २४ मेपासून सुरू (दहावीच्या निकालापर्यंत)

- उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी : २२ मेपासून सुरू

- ‘कॅप’ फेरीसाठी अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविणे : दहावीचा निकालानंतर सुरू होईल

‘कॅप’अंतर्गत प्रवेश प्रक्रियेचा असा असेल कालावधी

‘कॅप’अंतर्गत नियमित पहिली फेरी राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल आणि १० ते १५ दिवस चालेल. त्यानंतर नियमित दुसरी फेरी आणि तिसरी फेरी प्रत्येकी सात ते आठ दिवस राबविण्यात येईल. त्यानंतर दोन विशेष फेऱ्या होतील. प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोट्यांअंतर्गत प्रवेश समांतर सुरू असणार आहेत. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेऱ्या, दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या होतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी यंदा होणार नाही, अशी माहिती डॉ. परिहार यांनी दिली.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT