Railway Recruitment 2021: तुम्हाला जर रेल्वेमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण रेल्वेमध्ये अॅप्रेंटीस च्या हजारो पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 3378 पदांसाठी अर्ज करुन यामध्ये सहभागी होऊ शकतात.
दक्षिण रेल्वेमध्ये अॅप्रेंटीसच्या पद भरतीसाठी अर्ज पाठविण्याची शेवटची तारिख 30 जून आहे. तुम्ही जर अजून अर्ज पाठविला नसेल तर त्वरित रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा.
या पदांसाठी होणार भर्ती
नोटिफिशननुसार, रेल्वे च्या चार वर्कशॉप मध्ये एकूण 3378 पदांसाठी पर उमेदवारमध्ये सिलेक्शन केले जाईल. पेरंबूर येथे कॅरिज वर्क्स 936 पद, गोल्डनरॉक वर्कशॉप मध्ये 756 पद, पोदनूरमधील सिग्नल एन्ड टेलीकॉम वर्कशॉप मध्ये1686 पदांसाठी ही भरती होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
अॅप्रेंटीसच्या पदांसाठी 30 जून 2021 पर्यंत अर्ज पाठवू शकता. 30 जूनमध्ये संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अॅप्लीकेशन फॉर्म ची लिंक अॅक्टिव्ह असेल. त्या आधी जे लोक अर्ज करतील त्यांचे अर्ज सबमिट होतील. अधिक माहितीसाठी तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट सेल दक्षिण रेल्वेचे नोटिफिकेशन पाहू शकता.
शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा
या विविध पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता गरजेची आगेय 10वी आणि 12 वी आणि आईटीआई पास युव या पदांसाठी अर्ज करु शकता. वय मर्यादाबाबत सांगायचे झाले तर काही पदांसाठी 15-22 वर्षांची मर्यादा आहे. दर काही पदांसाठी 15 ते 24 वर्षांची मर्यादा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी शुल्क
अॅप्रेंटीसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी कॅटगरीच्या उमेदवारांना 100 रुपये शुल्क आहे. तर SC-ST दिव्यांग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.
असा करा अर्ज
पात्र उमेदवार सर्वात पहिले दक्षिण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाइटला https://sr.indianrailways.gov.in भेट द्या. त्यानंतर तुम्ही तेथे ऑनलाईन अर्ज करु शकता. ऑनलाईन अर्ज पाठविण्याआधी रेल्वे रिक्रुटमेंट सेल दक्षिण रेल्वेचे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.