RTO Archana Gaikwad sakal
पुणे

RTO Archana Gaikwad : अर्चना गायकवाड पुण्याच्या नव्या आरटीओ

पुणे आरटीओ कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी अर्चना गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. परिवहन विभागाने गुरुवारी (ता. १३) सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे आरटीओ कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी अर्चना गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. परिवहन विभागाने गुरुवारी (ता. १३) सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची पदोन्नतीचा आदेश सहा जून रोजी निघाला होता. मात्र पुणे व चंद्रपूर कार्यालयाचा आदेश निघत नसल्याने आरटीओ वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. गुरुवारी अखेर अर्चना गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

राज्यातील आरटीओ कार्यालयांपैकी महत्त्वाचे व सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे कार्यालय म्हणून पुणे आरटीओ कार्यालय ओळखले जाते. त्यामुळे या कार्यालयाचा पदभार घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते.

जळगावचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांचे नाव पुणे आरटीओपदी जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र अकलूज येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या अर्चना गायकवाड यांनी अखेर यात बाजी मारली. श्याम लोही यांची नियुक्ती चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.

स्वप्नील भोसले नवे उप प्रादेशिक अधिकारी

स्वप्नील भोसले यांची उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे या पदावर नियुक्ती झाली. गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला. भोसले यांनी यापूर्वी यवतमाळ येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम केले आहे, तसेच परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे सहाय्यक परिवहन आयुक्त म्हणूनदेखील काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT