AFMC and AFMRC Meeting Sakal
पुणे

पुण्यात सशस्त्र दल 'एएफएमसी'ची ७० वी व 'एएफएमआरसी'च्या ६० व्या बैठकीचे आयोजन

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने (एएफएमसी) सशस्त्र दलांची ७० वी वार्षिक वैद्यकीय परिषद आणि ६० वी सशस्त्र दल वैद्यकीय संशोधन समिती (एएफएमआरसी) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अक्षता पवार

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने (एएफएमसी) सशस्त्र दलांची ७० वी वार्षिक वैद्यकीय परिषद आणि ६० वी सशस्त्र दल वैद्यकीय संशोधन समिती (एएफएमआरसी) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे - येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने (एएफएमसी) ((AFMC) सशस्त्र दलांची (Armed Forces) ७० वी वार्षिक वैद्यकीय परिषद आणि ६० वी सशस्त्र दल वैद्यकीय संशोधन समिती (एएफएमआरसी) (AFMCR) बैठकीचे (Meeting) आयोजन करण्यात आले होते. हे तीन दिवसीय कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने (Online Process) शुक्रवारी संपन्न झाले. लष्करी वैद्यकीय सेवेतील (एएफएमएस) तरुण संशोधकांना वैद्यकीय संशोधनाबाबत मार्गदर्शन तसेच दिशादर्शक संशोधनाला प्रोत्साहन करणे या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

या परिषदेचे उद्घाटन बुधवारी (ता. २) एएफएमएसचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन व्हाईस ॲडमिरल रजत दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी व्हाईस ॲडमिरल रजत दत्ता यांनी कोरोना काळात एएफएमएसच्या उत्कृष्ट सेवांसाठी त्यांचे कौतुक केले. सीमावर्ती भागात प्रतिकूल परिस्थितीत व दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच वैद्यकीय व्यवसायाचे महत्त्व आणि बदलत्या तंत्रज्ञानासोबत कौशल्ये अद्ययावत करण्याचे आवाहन केले.

परिषदेत एएफएमएस संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली. नागरी वैद्यकीय समुदायासोबत सहकार्य वाढविण्यासाठी विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लखनौ कमांड रुग्णालयाचे प्रमुख मेजर जनरल संदीप थरेजा, ब्रिगेडियर मानस चॅटर्जी, ब्रिगेडियर डी विवेकानंद तसेच, एम्सच्या ऑन्को-अनेस्थेसिया अँड पॅलेटिव्ह मेडिसिन विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुषमा भटनागर, जेपीन ॲपेक्स ट्रॉमा सेंटरचे डॉ. अमित गुप्ता, विषाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन आदी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ‘पॅलेटिव्ह केअर’, पोलिओ निर्मूलन, भारतातील दुखापतीच्या घटनांमध्ये घट अशा विविध विषयांचा समावेश होता. एएफएमआरसीच्या वार्षिक बैठकीत या वर्षी १५१ नवीन संशोधन प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. तसेच सशस्त्र दलांसाठी उपयुक्त अशा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यावेळी एएफएमएसच्या संशोधकांना वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात त्यांना योगदान करता यावे यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला.

उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार -

या कार्यक्रमात डीजीएएफएमएसद्वारे पदव्युत्तर, सेवांतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रमातील शैक्षणिक उत्कृष्टता, मेडिकल जर्नल ऑफ आर्म्ड फोर्सेस ऑफ इंडिया (एमजेएएफआय) अंतर्गत सर्वोत्कृष्ट शोधनिबंधांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये औषधे, शस्त्रक्रिया, पॅथॉलॉजी, कम्युनिटी मेडिसिन आणि दातांची शस्त्रक्रिया या पाच विषयावरील संशोधकांना गौरविण्यात आले. तसेच लष्करी वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्सद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पाच सर्वोत्कृष्ट शोधनिबंधांसाठी डीजीएएफएमएस पदक असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT