Defense Expo sakal
पुणे

Defense Expo : ‘एमएसएमई’, स्टार्टअपवर लष्कराचे लक्ष ; लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे

‘‘स्वतःच्या क्षमतेच्या विकासाबाबतच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय लष्कराने ‘एमएसएमई’ आणि स्टार्टअप उद्योग या दोन्हींचा उपयोग करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे’’,

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘स्वतःच्या क्षमतेच्या विकासाबाबतच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय लष्कराने ‘एमएसएमई’ आणि स्टार्टअप उद्योग या दोन्हींचा उपयोग करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे’’, असे प्रतिपादन देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी (ता.२६) पिंपरी चिंचवडमध्ये केले.

मोशी येथे राज्य सरकारकडून आयोजित महाराष्ट्र एमएसएमई ‘डिफेन्स एक्स्पो’ या प्रदर्शनाला पांडे यांनी भेट दिली. त्यावेळी, ते बोलत होते. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एमएसएमई उद्योग, खासगी कंपन्या, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ)च्या प्रयोगशाळा तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रम (डीपीएसयू) यांच्यातर्फे विकसित स्वदेशी क्षमता आणि नवोन्मेष यांचे दर्शन घडवण्यात आले.

मनोज पांडे म्हणाले की, ‘‘देशाची अर्थव्यवस्था, औद्योगिक विकास, निर्यात आणि थेट परदेशी गुंतवणूकविषयक आकर्षकता वाढवणे यात महत्त्वाचे योगदान देणारे राज्य असल्याबद्दल महाराष्ट्राला श्रेय दिलेच पाहिजे. संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे देशातील पहिले राज्य होते.’’

‘‘महाराष्ट्र राज्याने हवाई उड्डाण तसेच संरक्षण विषयक उत्पादनाला प्रोत्साहन योजनेतील पॅकेजमधील महत्त्वाचे विषय म्हणून देखील घोषित केले. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील विमाने, जहाजे आणि बोटी यांच्या निर्मितीमध्ये २० टक्क्यांहून अधिक तसेच देशात उत्पादन होत असलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याच्या एकूण साठ्यापैकी ३० टक्के साठ्याच्या निर्मितीचे योगदान एकटे महाराष्ट्र राज्य देत आहे. ही आकडेवारी संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्यासंदर्भात या राज्याची धोरणात्मक दृष्टी दर्शवते.’’, असे पांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT