SYSTEM
पुणे

इंदापुरच्या उच्चशिक्षित अंगदची जिरेनियमची सुगंधी शेती; दुष्काळात वरदान

जिरेनियमच्या औषधी शेतीचा फायदेशीर दरवळ

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ऊस, केळी आदी नगदी पिकांना शेतकरी प्राधान्य देतात. अशा परंपरेला छेद देत इंदापूरमधील उच्चशिक्षित अंगद शहा (वय २६) या प्रगतिशील युवा शेतकऱ्याने फायदेशीर सुगंधी जिरेनियम औषधी शेती फुलविण्याचा प्रयोग यशस्वी करण्याची किमया साधली आहे.

एमबीएचे उच्च शिक्षण दुबई व सिंगापूर घेतलेल्या अंगदला सिंगापूरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी होती. मात्र, कोरोनामुळे मायदेशी परतल्याने आधुनिक संकल्पना राबवून त्याने शेतीला वैभव प्राप्त करून दिले आहे. जिरेनियममुळे निर्माण झालेला फायदेशीर शेतीचा दरवळ दुष्काळी भागासाठी वरदान ठरून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कोरोनामुळे मिळालेली सुवर्णसंधी समजून तो अस्सल शेतकरी बनला आहे.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष तथा प्रगतिशील शेतकरी गोकुळदास शहा, वडील मुकुंद शहा, आई नगराध्यक्षा अंकिता शहा व चुलते भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सिंगापूर येथून आल्यानंतर शेतीचे धडे गिरवले. शेतीचा कुठलाही पूर्वानुभव नसताना त्याने सुरवातीस दोन एकर शेतीमध्ये शेतीमालाचे उत्पादन केले. यामध्ये सीताफळ, केळी, मिरची, वांगी, हळीव कांदा, झेंडूचे यशस्वी उत्पादन घेतले व नफा मिळविला. यामुळे आत्मविश्वास उंचावल्याने अंगदने दर तीन महिन्याने शेतकऱ्यांच्या हातात कष्टाचा पैसा देणाऱ्या जिरेनियम शेती करण्याचा निर्णय घेऊन गलांडवाडीनंबर एकमध्ये शेती फुलविली.

अशी फुलवली शेती...

अंगदने गलांडवाडीनंबर एक येथील पाण्याचा निचरा होणाऱ्या ३ एकर जिरायती शेतीत सप्टेंबर २०२० मध्ये जिरेनियम या सुगंधी औषधी वनस्पतीची १ बाय ५ फूट, त्यानंतर २० ते २५ दिवसात १ बाय ३ फूट अशी आणखी ५ एकरवर शेती फुलवली. उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून केलेल्या पाइपलाइनने पाणी शेतात आणून त्याने ठिबक सिंचनने या शेतीस पाण्याचा वापर केला आहे. या शेतीत त्याने बुरशीनाशक, ह्युमिकअसिडचा वापर केला आहे.

जिरेनियमचे ऑइल १३ हजार रुपये लिटर

जिरेनियम पिकापासून ऑइलची निर्मिती केल्यानंतर सुका कचरा खाली राहतो. त्याचा खत म्हणून वापर होतो. पिकापासून निघालेले ऑइल १२ ते १३ हजार रुपये लिटरने विकले जात असल्याने एका एकरात पाच ते सहा लाख रुपयांची कमाई होते. जिरेनियम शेती दुष्काळी भागास वरदान ठरण्यास मदत होईल, असे ‘सकाळ’शी बोलताना अंगदने सांगितले.

प्रकिया उद्योग सुरू

जिरेनियमचा पहिला तोडा पाच महिन्याने निघाला. त्यास मुंबई मार्केटमध्ये साडेबारा हजार रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळाला. सध्या एकरी ९ ते १० टन उत्पादन निघत असून, त्यास शाश्वतबाजार पेठ मिळाली आहे. अंगदने जिरेनियम पाला वाळविण्यासाठी शेड उभी करून स्टीम डिस्टीलेशनचा वापर करत या औषधी वनस्पतीचे तेल काढण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एक टन क्षमतेच्या प्रकल्पात बॉयलर, कंडेन्सर, केबल, टेबल सह १० लाख रुपये खर्चून प्रकिया उद्योग सुरू केला आहे.

''जिरेनियम हे सुगंधी व औषधी वनस्पतीचे पीक लावल्यानंतर तीन वर्ष यामधून उत्पन्न मिळते. एक एकर जिरेनियम शेतीसाठी किमान साडेनऊ ते दहा हजार रोपे लागतात. हे पीक वर्षात तीनवेळा कापणीला येते. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने खेळते भांडवल निर्माण होते. फवारणी तसेच महागडे खत मारण्याची आवश्यकता नाही. इतर पिकांच्या तुलनेत या पिकास ८० टक्के खर्च कमी येतो. ''

- अंगद शहा, जिरेनियम उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT