Kalyani Nagar Accident sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : पबचा बाजार अन् जनता बेजार;मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा परिसरात सुमारे ७० पब

मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, विमाननगर, खराडीमध्ये सुमारे ७० पब असल्याचे समोर आले आहे. ‘ॲटमॉस्फियर म्युझिक’ असा गोंडस शब्द वापरून सर्रास पबचा व्यवसाय केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, विमाननगर, खराडीमध्ये सुमारे ७० पब असल्याचे समोर आले आहे. ‘ॲटमॉस्फियर म्युझिक’ असा गोंडस शब्द वापरून सर्रास पबचा व्यवसाय केला जातो. पब, दारू, हुक्का, गांजा, ड्रग्ज खुलेआम उपलब्ध असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे.

व्यवसायाची जागा, हद्द, खाद्यपदार्थांचा परवाना, दारू विकण्याचा परवाना, बंद जागेमध्ये सुरू असलेले संगीत, खुल्या जागेतील संगीत अशा विविध तांत्रिक बाबी पुढे करून कायद्यातून पळवाट काढण्यात व्यावसायिक तरबेज झाले आहेत. पूर्व भागात असलेल्या आयटी कंपन्या आणि उच्चभ्रू महाविद्यालयांतील विद्यार्थी समोर ठेवून व्यावसायिकांनी व्यवसाय वाढवले आहेत. पहाटे तीनपर्यंत; तर कधी-कधी अगदी सकाळी सहापर्यंत हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. पब संस्कृतीमुळे नगर रस्ता परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी विमाननगर, येरवडा, कल्याणीनगर, चंदननगरमधील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या, बैठका घेतल्या; परंतु समस्या सुटली नाही.

‘पोलिसच राखणदार...’

नगर रस्ता परिसरात फोफावलेल्या पब संस्कृतीबाबत नागरिकांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसच चालकांचे राखण करतात; तर काही ठिकाणी पोलिसच पार्टनर असल्यामुळे अवैद्य धंदे बंद कसे होणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. खराडीमध्ये एका उच्चभ्रू टॉवरमध्ये पहाटेपर्यंत पब सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. खराडीत एका ठिकाणी अशा रेस्टॉरंट आणि बारला एक पोलिस अधिकारीच पार्टनर असल्याची माहिती समजली. मुंढव्यातील काही पबवर राजकीय वरदहस्त आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पब, रेस्टॉरंट, बारची संख्या

  • खराडी : १३

  • विमाननगर : १९

  • मुंढवा आणि

  • कोरेगाव पार्क : २६

  • कल्याणीनगर व येरवडा : ११

रहिवासी म्हणतात...

  •   प्रभा करपे (खराडी) : खराडीतील पंचशील टॉवरजवळ सकाळी तीनपर्यंत पब सुरू असतो.

  •   नीलम अय्यर (विमाननगर) : पब, बार बंद करण्यासाठी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पोलिसांना दिले होते.

  •   लता शिंदे (कोरेगाव पार्क) : दारू पिऊन रस्त्यावर लोळत पडलेले अनेक तरुण-तरुणी दिसतात.

  •   ड्रायसन डिक्सन (कल्याणीनगर) : पब सुटल्यानंतर तरुण-तरुणी रस्त्यावर धिंगाणा घालतात.

  •   अभिजित साळवे (कल्याणीनगर) : रात्री उशिरापर्यंत पबबाहेर पोलिसच उभे असतात.

पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब, बार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले व्यसनांच्या आहारी जात असून अपघातांच्या घटना घडत आहेत. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT