पुणे

पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करा

CD

पुणे, ता. ३१ ः शहरात पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), महावितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात कामे करताना पावसाळी गटारांची स्वच्छता न करणे, चेंबर बुजविणे यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबत आहे. संबंधित शासकीय विभागांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यासंदर्भात महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन या विभागांना त्यांच्या हद्दीतील काम करून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी महापालिकेसह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील नालेसफाई, पावसाळी गटारांची कामे सुरू केली आहेत. धोकादायक ठिकाणांवरील स्वच्छतेची कामे पूर्ण झालेली असली तरी अनेक भागातील पावसाळी गटारांच्या चेंबरची स्वच्छता अद्याप झालेली नाही. त्याच बरोबर शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो, काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) ताब्यात आहेत, तेथे त्यांच्या ठेकेदाराचा दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असला तरी अशा ठिकाणी पावसाळी चेंबरची स्वच्छता गेल्या अनेक वर्षात केलेली नाही. कात्रज ते देहू रोड हा बाह्यवळण मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो, पण एनएचएआयकडून पावसाळ्याच्या तोंडावर या रस्‍त्यावरील पाणी निचरा होत नसल्याबद्दल बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यावेळी एनएचएआय, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी ही कामे करून घेतली जातील असे आदेश दिले आहेत.
पीएमआरडीएकडून गणेश खिंड रस्त्यावर मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामात अनेक ठिकाणचे चेंबर बुजले गेले आहेत. तर काही चेंबर हे समान पातळीमध्ये नसल्याने त्यातून पाणी वाहून जात नाही. त्यामुळे त्यांनी या चेंबरची दुरुस्ती करून पाणी निचरा होण्याची व्यवस्था करावी, असा आदेश दिला आहे.

विद्युत वाहिन्यांचा अडथळा
शहरात महापालिकेने नाल्यांवर कल्व्हर्ट बांधलेले आहेत. तेथे महावितरण कंपनीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या व्यवस्थित न बसविल्याने त्या नाल्यांमध्ये लटकत आहेत. पावसाळ्यात नाल्यांची पाणी पातळी वाढल्यानंतर या विद्युत वाहिन्यांत कचरा अडकून प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने लटकणाऱ्या विद्युत वाहिन्या व्यवस्थित लावून घ्याव्यात, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.


पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आज महापालिकेने पीएमआरडीए, महावितरण, पीडब्ल्यूडी, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी त्यांनी आवश्‍यक असलेली कामे करावीत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यांनी त्वरित आवश्‍यक त्या ठिकाणी कामे केले जातील असे सांगितले आहे.
-पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT