Narendra-Dabholkar sakal
पुणे

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येमागील सूत्रधारांना अटक करा

‘अंनिस’ची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना मारणाऱ्यांना अटक झाली आहे. मात्र, यामागील सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे या हत्येमागील सूत्रधारांना अटक करावी, अशी मागणी अंनिसने केले आहे. ही मागणी करणारे निवेदन शनिवारी अंनिसकडून तहसिलदारांना देण्यात आले.

डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. मात्र अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयितांविरुद्ध अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. या खुनाचा तपास डॉ. तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबला आहे. मात्र खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती अंनिसकडून देण्यात आला.

सूत्रधार सापडले असते तर कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या नसत्या. या हत्यांमागील सूत्रधार पकडले जात नाही, तोपर्यंत विवेकी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका टळलेला नाही. त्यामुळे सूत्रधारांना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. अंनिसचे अध्यक्ष श्रीपाल ललवानी, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, पुणे शहराध्यक्ष अनिल वेल्हाळ, अनिल तिकोनकर आणि वसंत कदम यावेळी उपस्थित होते. तहसीलदार शुभांगी गोंजारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना साकडे

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाची तपास प्रक्रिया गतिमान आणि लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारने पंतप्रधानांकडे आग्रह धरून पाठपुरावा करावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेच्या ११० कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी स्वीकारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT