Arrested one for buying bike on loan of another person name by fake documents 
पुणे

बाईकची हौस नडली; बनावट कागदपत्रासह दुसऱ्याच्या नावे कर्ज घेणं पडलं महागात

सकाळवृत्तसेवा

पुणे : बनावट कागदपत्रांचा वापर करुन दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने कर्ज प्रकरण करीत दुचाकी खरेदी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकानरगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

किरणकुमार शशिकांत पेडणेकर (वय 34 , रा. नायगाव वसई) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रितेश सुभाष शिंदे (वय 32, रा. विवेकानंदनगर, ठाणे पश्‍चिम) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांच्या मोबाईलवर कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचा एक मेसेज आला होता. त्यांनी याबाबत बॅंकेला तत्काळ फोन करून आपण कर्जासाठी अर्ज केला नसल्याचे सांगितले. हा प्रकार काय आहे, हे पाहण्यासाठी ते बॅंकेत पोचले. त्यावेळी त्यांच्या नावावर एका दुचाकीची नोंदणी केली असून त्यासाठीच्या कर्ज प्रकरणासाठी बॅंकेकडे अर्ज दाखल असल्याचे बॅंकेने सांगितले. त्यानंतर त्यांनी बॅंकेकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली, त्यावेळी कागदपत्रांवर त्यांचे नाव होते, परंतु छायाचित्र मात्र वेगळ्याच व्यक्तीचे होते. बॅंकेने संबंधीत व्यक्तीच्या नावाने धनादेश काढला होता. त्यामुमे फिर्यादींनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन हा प्रकार सांगितला. 

दरम्यान, सहकारनगर पोलिसांनी गाडी बुक केलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यावेळी आरोपीने ती गाडी प्रितेश शिंदे नावाने बुक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधीत व्यक्ती गाडीच्या शोरुमममध्ये गाडी खरेदी करण्यासाठी आली होती, त्याचवेळी फिर्यादी व पोलिसांनी तेथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने त्याचे खरे नाव पेडणेकर असून त्याने अनिल नवथले, मधुकर सोनवणे यांच्याशी संगनमत करुन वेगवेगळ्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करीत, कर्ज मंजूर करून घेत दुचाकी घेतल्याचा प्रकार समोर आला. पेडणेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नवी मुंबईत याच प्रकारचा बनावट कागदपत्राच्या आधारे दुसऱ्याच्या नावाने कर्ज घेऊन महागडे मोबाईल फोन केल्याचा गुन्हा दाखल आहे. 

व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाला अद्याप प्रतिक्षा

आरोपींनी प्रितेश शिंदे, सुनिल यादव, सुरेंद्र यादव, के. स. चौरशीया, अमोल गायकवाड, क्‍लिओ डिसुझा, विजय पंडित, निपाणी शिवकुमार, रिषभ कनोजीया यांच्या नावाने मुंबई व पुणे येथे शोरुममध्ये बनावट कागदपत्रे सादर करुन, कर्जाद्वारे वाहने घेतली आहेत. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तत्काळ सहकारनगर पोलिसांशी 020-24228113/24226604 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

सावधान! Redmi Mi7 प्रो स्वस्तात घेण्याचा फंडा पडला महागात; सायबर चोरट्यांनी गंडवलं

देशातील मोठ्या ब्रॅंडच्या मधामध्ये चिनी साखरेची भेसळ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT