asha pawar mother of ajit pawar says my son should became cm of maharashtra politics Sakal
पुणे

Ajit Pawar : 'माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे,' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांची भावना

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी : माझे वय आता ८६ आहे. त्यामुळे माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे. मात्र पुढचे काय सांगावे. बारामतीकरांचे काटेवाडीकरांचे दादा वर प्रेम आहे. पण बघू पुढे काय होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी भावना व्यक्त केली.

काटेवाडी येथे रविवारी (ता. ५) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार व पत्नी सुनीता पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सकाळी साडेसातच्या दरम्यान हजेरी लावली होती. आशा पवार यांनीच येथे प्रथम मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, पूर्वीची काटेवाडी आणि आत्ताच्या काटेवाडी मध्ये खूप बदल झाला आहे.

माझ्या सूनबाईने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा बदल घडवला. दादा उपमुख्यमंत्री कधी व्हावेत असे आपणास वाटते, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला मनापासून वाटते लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे पण बघू काय होते पुढचे काय सांगावे असेही आशा पवार यावेळी म्हणाल्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने प्रथमच ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला हजर राहू शकले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bopdev Ghat: आणखी किती पळणार... बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना अखेर पोलिसांनी शोधलं

सूरजला सिनेमात घेतलं म्हणून ट्रोल करणाऱ्या कलाकारांना केदार शिंदेंनी सुनावलं, म्हणाले- तुम्ही कधीही...

दलित कुटुंबासोबत राहुल गांधींनी घेतला जेवणाचा आस्वाद; 'त्या' जेवणाचे घेतले नमुने, महत्त्वाची माहिती आली समोर

Dussehra 2024: यंदा 12 की 13 ऑक्टोबर कधी साजरा केला जाणार दसरा? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् वेळ

Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या गाढवामुळे सलमान आला अडचणीत! बिग बॉसला आली कायदेशीर नोटीस, काय हा प्रकार ?

SCROLL FOR NEXT