Ashadhi Wari 2023 - संत तुकारामांचा सोहळा द्वादशीच्या कीर्तनानंतर सकाळी आठ वाजता यवतच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. आज लोणी काळभोर ते यवत असा २७ किलोमीटरचा टप्पा आहे. हा टप्पा पार करण्यासाठी वारकऱ्यांची पाउले झपझप पडत आहेत.
मोठा टप्पा पार करायचा असल्याने सोहळ्याला पहाटे जाग आली. पहाटे संत तुकोबांच्या पालखीतील पादुकांना अभिषेक करण्यात आला. बुधवारी योगिनी एकादशीची तिथी होती. तर आज गुरुवारी द्वादशी (बारस) आहे.
द्वादशीच्या परंपरेनुसार देहूकर मालकांचे कीर्तन सकाळी सहा ते आठ अशी कीर्तन सेवा पालखी समोर झाली. यावेळी कीर्तननंतर खिरापत वाटण्यात आली. एकादशीचा उपवास सोडत सोहळा यवतकडे मार्गस्थ झाला.
देहू ते पंढरपूर मार्गावरील लोणी- काळभोर ते यवत असा २७ किलोमीटरचा असा मोठा टप्पा आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात सोहळा चालू लागला.
संत तुकाराम महाराज यांचा
कर्म धर्म नव्हती सांग ।
उण्या अंगें पतन ॥१॥
भलत्या काळें नामावळी ।
सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.।।
प्रायश्चित्तें पडती पायां ।
गाती तयां वैष्णवां ॥२॥
तुका म्हणे नुपजे दोष ।
करा घोष आनंदे ||३||
अभंग गात वाटचाल सुरू आहे.
सोहळा उरुळी- कांचन येथे दुपारी एक वाजन्याच्या सुमारास सोहळा विसाव्याला थांबणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.