पुणे : आषाढी वारी २०२३ साठी वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखींचे आज १२ जून रोजी पुणे शहरात आगमन झाले. शहरातील नागरिकांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यादरम्यान पालखी सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दिंडीत पंगत सेवा दिल्याचे पाहायला मिळाले.
सुषमा अंधारे यांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठीच्या पंगत सेवेदरम्यान चपात्या लाटतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे या वरकरी महिलांसोबत मोठ्या चपळाईने चपात्या लाटताना दिसत आहेत. या फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडोओवर लोक लाइक्स आणि कमेंट करत आहेत.
पालखीच्या आगमनासाठी पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली होती. यंदा सात ते आठ लाख वारकऱ्यांचे पुण्यनगरीत आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पालखी सोहळ्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी यंदा साडेसात हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.
यावर्षी २९ जून रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे त्यामुळे देहू संस्थानने वारीचे वेळापत्र काढले आहे. यंदाचे पालखी सोहळ्याचे ३३८वे वर्ष आहे. पालखीचं १० रोजी प्रस्थान होईल. तर २८ जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. हा १९ दिवसांचा पालखी प्रवास असणार आहे.
पुढचा प्रवास कसा असेल? (ashadhi wari 2023 time table)
१२ जून रोजी नानारपेठ
१३ जून रोजी नानारपेठ निवडुंगा विठ्ठल मंदिर
१४ जून रोजी लोणीकाळभोर
१५ जून यवत
१६ जून वरवंड
१७ जून रोजी उंडवडी गवळ्याची
१८ जून बारामती
१९ जून रोजी सणसर
२० जून रोजी आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण होईल व मुक्काम.
२१ जून निमगाव केतकी
२२ जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम
२३ जून रोजी सराटी
२४ जून रोजी निरा स्नान व तिसरे गोल रिंगण आणि अकलूज येथे मुक्काम.
२५ जून रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण, तर रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल.
२६ जून रोजी सकाळी धावा रात्री पालखी मुक्का पिराची कुरोली येथे होणार आहे.
२७ जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण व वाखरी येथे मुक्काम.
२८ जून रोजी वाखरीवरुन पालखी पंढरपुरात दाखल होईल.
दुपारी उभे रिंगण व त्यानंतर पंढरपुरातील संत तुकाराम महाराज मंदिर येथे पालखी सोहळा होईल.
बुधवार, दि २९ जून रोजी तुकाराम महाराज संस्थान मंदिर येथे पालखी मुक्कामी असेल.
२९ जून ते ३ जुलै रोजी दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महारज संस्थानच्या नवीन इमारतीमध्ये असेल. नंतर परतीचा प्रवास सुरु होईल.
१३ जुलै रोजी पालखी देहू येथे विसावेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.