Ashadhi Wari 2023 - डोर्लेवाडी व बारामती परिसरातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय व्हावी यासाठी डोर्लेवाडी (ता.बारामती) येथील वै.गणपत आबाजी काळे महाराज दिंडी,सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने कीर्तन, भारुड कार्यक्रमाचे मानधन व लोकवर्गणीतून भक्त निवास इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.आषाढी वारीपासून भाविकांच्या निवासाची मोफत सोय होणार असल्याने भाविकांकडून भजनी मंडळाचे कौतुक होत आहे.
येथील सांप्रदायिक भजनी मंडळाची सामुदायिक दिंडी सुमारे ३० वर्षापासून देहू ते पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी चालत जात आहे.ना नफा ना तोटा या तत्वावर भाविकांना वारीमध्ये सुविधा दिल्या जात आहेत.वारी काळात पंढरपूर येथे दिंडी गेल्यानंतर स्वत:ची जागा नसल्यामुळे वारकऱ्यांना फार अडचणी व गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
त्यामुळे दिंडीला स्वत:ची जागा घेण्यासाठी विचार सुरु झाला.आणि सन २०१६ मध्ये कीर्तन भारुडातून जमा झालेली मानधनाची रक्कम,दिंडीतील शिल्लक रक्कम व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून १९ लाख रुपयांची बिगरशेती २ गुंठे जागा खरेदी केली.व प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आली.
खाली पार्किंग पहिला मजल्यावर हॉल व त्याचेवरती २ मजले निवासासाठी खोल्या असे बांधकामाचे नियोजन करण्यात आले आहे.या बांधकामासाठी पुण्याचे उद्योजक व डोर्लेवाडीचे सुपुत्र दशरथ जाधव,नारायण बनकर,लक्ष्मण घनवट,नवी सांगवी पुणे येथील स्नेहबंध मीटर मंडळ,भोसरी येथील डोर्लेवाडी मित्र मंडळ,झारगडवाडी येथील वास्तू विशारद राजेंद्र करणे,स्वातंत्र्यसैनिक साहेबराव दळवी यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे.
शिवाय डोर्लेवाडी, झारगडवाडी,तावशी, ढेकळवाडी,कण्हेरी,सोनगाव,गुणवडी,गोजुबावी व बारामती पंचक्रोशी येथील ग्रामस्थांनी देखील या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी दिली आहे.सध्या पार्किंग व पहिल्या मजल्याचे स्लाब टाकून झाले आहेत.
या दोन्ही इमारतीत शौचालय व स्नानगृह बांधकाम करण्यात आले आहे. गतवर्षी शौचालय व स्नानगृह बांधकाम नसल्यामुळे व पाऊस जास्त आल्यामुळे वारकऱ्यांना आषाढी एकादशी दिवशीच घरी परत यावे लागले होते. सध्या शौचालय व स्नानगृह बांधकाम पूर्ण झाल्यामुळे यावर्षीपासून वारी काळात व इतर दिवशी भाविकांना रहाणेची व मुक्कामाची सोय होणार आहे. त्यामुळे दिंडीतील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आर्थिक मदतीचे आवाहन ..
पंढरपूर येथील भक्तनिवासात बारामती परिसरातील भाविकांची मोफत राहण्याची सोय व्हावी या हेतूने सांप्रदायिक भजनी मंडळाने मोठे योगदान दिले आहे.३० वर्षाहून अधिक काळ दिंडीच्या माध्यमातून व भारुड,कीर्तनाचे कार्यक्रम करून मिळणाऱ्या मानधनाची रक्कम वैयक्तिक कोणीही न घेता ती रक्कम शिल्लक ठेवली व मंडळातील सभासद यांनी वैयक्तिक प्रत्येकी ३० ते ४० हजार रुपयांची वर्गणी जमा केली आहे.
लोकसहभागातून जागा खरेदी व काही बांधकाम केले आहे. बांधकाम पूर्ण होण्यास अजून ५० लाख रुपयांची गरज आहे.परिसरातील दानशूर व्यक्ती व भाविकांनी भक्तनिवास बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन दिंडी प्रमुख बाळासाहेब महाराज नाळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.