Ashadhi Wari 2024 Warkari enjoyed traveling by Pune Metro Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi procession rak94
Ashadhi Wari 2024 Warkari enjoyed traveling by Pune Metro Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi procession rak94 
पुणे

Ashadhi Wari 2024 : पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांना पुण्यातील मेट्रोची भुरळ; अनेकांनी लुटला प्रवासाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ३० ः पांढरीशुभ्र कपडे, कपाळी गंध-टीळा अन्‌ हातात भगवी पताका घेऊन पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांनाही पुण्यातील मेट्रोची भुरळ पडली. मेट्रो स्थानकावरील लिफ्ट, सरकत्या जिन्यांवरून तिकीट घर अन्‌ तिकीट घेतल्यानंतर अडखळत, कावरे-बावरे होत आपोआप उघडणारा दरवाजा त्यांच्यासाठी अप्रुप होता. अशा भारावलेल्या अवस्थेत त्यांची पावले मेट्रोमध्ये शिरली आणि थंडगार मेट्रोतुन आयुष्यातील पहिल्या मेट्रो प्रवासाचा आनंद त्यांनी लुटला!

संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मेट्रोने भुरळ घातली होती. दिंडीसमवेत पायी जातानच काही तरुण वारकऱ्यांनी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना आपल्यासमवेत घेऊन मेट्रोच्या प्रवासाची सफर करण्याचा आनंद लुटला. पिंपरी चिंचवड, नाशिक फाटा, बोपोडी या ठिकाणांसह नगर रस्ता, कल्याणीनगर, पुणे रेल्वे स्थानक अशा ठिकाणांहून वारकरी मेट्रोतुन प्रवास करण्यास येत होते.

मेट्रो स्थानकापासून ते प्रत्यक्षात मेट्रोमध्ये बसण्यापर्यंत गोंधळून गेलेल्या वारकऱ्यांना मेट्रोने नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही सावरुन घेतले. मेट्रो स्थानकावरील लिफ्ट, सरकते जिने, मेट्रोमध्ये प्रवेश करण्यापासून ते उतरण्यापर्यंतचे मार्गदर्शन सहप्रवाशांकडून केले जात होते. अनेक वारकऱ्यांनी तर मेट्रोने प्रवास करायचाच, असा निश्‍चय करून मेट्रोतुन प्रवास केला. काही ठिकाणी अडचण आल्यानंतर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांकडूनही वारकऱ्यांना सहकार्य करण्यात आले. एकूणच पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांनी मेट्रोतुन प्रवास करण्याचा आनंद लुटला.

'जवान' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा

वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. अनेकांनी बॉलीवुड अभिनेता शाहरूख खान याचा "जवान' हा चित्रपट पाहीलेला होता. या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेली मेट्रो, वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे नाव, यामुळेही त्यांच्यात मेट्रोचे आकर्षण होते. मेट्रोतुन प्रवास करताना, विशेषतः शिवाजीनगर ते न्यायालय दरम्यानच्या भूयारी मार्गातील प्रवासावेळी त्यांनी चित्रपटाच्या आठवणीस उजाळा दिला.

"संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो. यावर्षीही दिंडीसमवेत आम्ही जात आहोत. मागील वर्षी मेट्रो पाहीली होती. पण यंदा, मेट्रोतून प्रवास करण्याची इच्छा होती. त्यानुसार, पिंपरी चिंचवड महापालिका येथून न्यायालयापर्यंत मेट्रोतून प्रवास केला.आम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करतो, पहिल्यांदाच इतक्‍या छान, स्वच्छ मेट्रोतुन प्रवास करता आला.' किसन जमदाडे, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोरेगावमधील रहिवाशांना High Court चा मोठा दिलासा; 'या' भूखंडावरील अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्याचे निर्देश

जयंत पाटलांचा 'हा' पॅटर्न राज्यात राबविणार; उपमुख्यमंत्री अजितदादांची मोठी घोषणा, नेमका कोणता आहे पॅटर्न?

Jalgaon News : नाल्यातून चेंडू काढताना सहावर्षीय बालक गेला वाहून; पोलिसांकडून शोध सुरू

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यात अकोल्याचा जवान शहीद; गावावर शोककळा, चार दहशतवाद्यांचा खात्मा

Monsoon Care Tips : पावसाळ्यात त्वचेच्या संसर्गाचे होऊ शकतात हे गंभीर आजार, वेळीच ओळखा लक्षणे

SCROLL FOR NEXT