Saath Chal sakal
पुणे

Saath Chal : आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’चा पिंपरी, पुण्यात ‘साथ चल’ उपक्रम

‘सकाळ माध्यम समूह’ आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रमातून ‘वारी विठुरायाची; पर्यावरण संवर्धनाची’ घेऊन येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - प्लास्टिकचा अतिवापर, वृक्षतोड, रसायनांचा मारा, नद्यांचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाला हानी पोचत आहे. त्याला आळा घालण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक चळवळ उभारण्याची गरज आहे. याच उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूह’ आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रमातून ‘वारी विठुरायाची; पर्यावरण संवर्धनाची’ घेऊन येत आहे. ‘फिनोलेक्स केबल्स’ हे प्रायोजक आहेत.

‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें।

पक्षी ही सुस्वरें आळविती।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास।

नाहीं गुण दोष अंगी येत।।

आकाश मंडप पृथुवी आसन।

रमे तेथें मन क्रीडा करी।।

कंथाकुमंडलु देहउपचारा।

जाणिवतो वारा अवश्र्वरू ।।

संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ही चरणे. पर्यावरण वा निसर्गाचे महत्त्व त्यातून अधोरेखित होते. हाच धागा पकडून ‘सकाळ’ यंदा आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रमातून ‘वारी विठुरायाची आणि पर्यावरण संवर्धनाची’ ही संकल्पना घेऊन ‘पर्यावरण संवर्धनाचा’ संदेश देणार आहे.

‘साथ चल’ उपक्रम १२ जून रोजी पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी चौक ते एचए कंपनी कर्मचारी वसाहतीजवळील भुयारी मार्ग आणि १४ जून रोजी पुण्यातील पूलगेट येथील महात्मा गांधी बसस्थानक येथे राबविण्यात येणार आहे. वारीत सहभागी झालेल्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली जाणार आहे.

वारीचे उद्दिष्ट

  • वैष्णवांसोबत दोन पावले चालण्याचा आनंद

  • उपक्रमाच्या निमित्ताने चालण्याचा व्यायाम

  • आरोग्याबरोबरच पर्यावरणाबाबत जनजागृती

  • स्वतःसह समाजहितासाठी पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा सामूहिक संदेश

कुठे व किती वाजता सहभागी व्हाल?

सोमवार, ता. १२ जून : मोरवाडी चौक, फिनोलेक्‍स कंपनी प्रवेशद्वार ते एचए कॉलनी प्रवेशद्वार भुयारी मार्ग : अंतर १.२ किमी, सकाळी ५.३०

बुधवार, ता. १४ जून : महात्मा गांधी बसस्थानक, पुलगेट, पुणे कॅम्प, सकाळी ६.३०

इथे नोंदवा सहभाग...

मोबाईल - ९५५२५६०१६१, ९०११०३१६३१ (पिंपरी-चिंचवड),

८००७२२१५४२, ८८८८८०१४३१ (पुणे)

ई-मेल - editor@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT