sant tukaram sant dnyaneshwar maharaj palkhi sohala  sakal
पुणे

Ashadhi Wari : वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल

पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी लोटला जनसागर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कपाळी अष्टगंध, डोक्‍यावर फेटा, खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन ‘ज्ञानोबा- तुकोबां’च्या नामघोष करत पंढरीला निघालेला वैष्णवांचा मेळा रविवारी पुण्यनगरीत दाखल झाला.

या संतसोहळ्याची दिवसभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो पुणेकरांचा माथा संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथावर टेकत असतानाच या भावभक्तीच्या सोहळ्याला खुद्द पावसानेही हजेरी लावली. रस्त्यांच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

पालखीचे दर्शन घेत आपला नमस्कार पंढरीच्या विठ्ठलास पाठविला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांचा यथोचित पाहुणचार करण्यास पुणेकर विसरले नाहीत.

राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने पेरण्या उरकून लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीच्या वारीसाठी देहू-आळंदीकडे वळली. संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने देहू-आळंदीतून प्रस्थान ठेवले. विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन निघालेले वारकरी व दोन्ही पालख्यांनी रविवारी दुपारच्या सुमारास पुण्याच्या वेशीत प्रवेश केला.

आळंदी रस्त्यावरील कळस येथे दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी., अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, किशोरी शिंदे, प्रभारी नगर सचिव योगिता भोसले आदी उपस्थित होते.

दरम्यान, संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळादेखील दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बोपोडी येथे दाखल झाला. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

रस्त्यांवर भरला वारकऱ्यांचा मेळा

रविवारी सकाळपासूनच शहरातील बहुतांश रस्त्यांवर वारकऱ्यांचे समूह दिसत होते. विशेषतः दुपारनंतर व पालख्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्य रस्त्यांवर अक्षरशः वारकऱ्यांची लाट उसळली. टाळ-मृदंगाच्या गजरात, राम-कृष्ण-हरीचा जयघोष करीत वारकरी शांतपणे पालखी मार्गावरून चालत होते. तर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचे समूहदेखील आपापल्या दिंड्यांसमवेत मार्गक्रमण करत होते.

विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात तल्लीन होऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या पायावरही भाविक डोके ठेवून आशीर्वाद घेत होते. दिंड्यांसमवेतच्या प्रमुख संतांचे पालखी रथ, पालखीमधील पादुका, नगारा, मानाचे अश्‍व, रथाच्या बैलजोडीचेही दर्शन घेण्यासही भाविक विसरले नाहीत.

दिंड्यांसमवेत आयटी दिंडी, पर्यावरणपूरक दिंडी, ज्येष्ठ नागरिकांची दिंडी अशा विविध प्रकारच्या दिंड्यांनीही सहभाग घेतला होता. तर शहरातील काही नागरिकांचे समूहदेखील दिंड्यांसमवेत पायी जात होते.

सुट्टीचा दिवस सार्थकी लागला

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पुणेकरांना पालखीचे दर्शन घेणे सोईस्कर ठरले. रविवारी दुपारपासूनच आळंदी रस्ता, बोपोडी येथील जुना मुंबई-पुणे महामार्ग, शिवाजीनगर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, लक्ष्मी रस्ता, नाना पेठ व भवानी पेठ या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रस्त्यांच्या दुतर्फा भाविक आपल्या कुटुंबासमवेत पालखीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. लहान मुलांची वारकरी, विठ्ठल, रुक्मिणीची वेशभूषा करण्यात आली होती.

अनेक तरुण-तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करून पालखीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. पालखीतील दिंड्यांमध्ये सहभागी झालेले वारकरी, अश्‍व, पालखी रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अक्षरशः रीघ लागली होती. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. अनेक संस्था, संघटना, कंपन्या, राजकीय पक्ष यांच्याकडून वारकऱ्यांना ठिकठिकाणी चहा, पाणी, बिस्किटे, फराळाचे जिन्नस, छत्र्या, रेनकोट, वस्तु ठेवण्यासाठी पिशव्या अशा वस्तुंचे वाटप करण्यात आले.

राजकीय पक्षही भक्तिरसात न्हाऊन निघाले

विविध राजकीय पक्षांकडून पालखी सोहळ्याचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी व विश्रांतवाडी येथे दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. शहर काँग्रेसच्यावतीने बोपोडी, म्हस्के वस्ती येथे स्वागत करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह विनोद रणपिसे, राजीव ठोंबरे, राजेंद्र भुतडा, सुंदराताई ओव्हाळ आदी उपस्थित होते.

भाजपच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील संत ज्ञानेश्‍वर महाराज पादुका चौक, संत तुकाराम महाराज पादुका चौक येथे पालख्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आरती करण्यात आली.

तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तुकाराम पादुका चौक येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पालिका आयुक्तांनीही केले पालखीचे सारथ्य

कळस येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे स्वागत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. त्यावेळी डॉ. भोसले यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. महापालिका आयुक्तांकडून पहिल्यांदाच पालखी रथाचे सारथ्य करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांनी बोपोडी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यावेळी पृथ्वीराज यांनीही पालखी रथाचे सारथ्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT