Ashadhi Wari2023 - विविध सण - उत्सव आणि सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमात आपण रांगोळी काढतो. पण सासवड (ता. पुरंदर) येथील सोमनाथ भोंगळे यांनी आपल्या कमर्शियल जी. डी. आर्टसच्या जोरावर व अभ्यासपूर्ण कल्पनाशक्तीने आगळ्या `रांगोळी`चा ठसा उमटविला आहे. `थ्री - डी रंगोळी` ने ते आता स्थानिकसह शहर व जिल्ह्यातही प्रसिध्द पावले आहेत.
तर राज्याच्या सीमा अोलांडून त्यांची ही कला बाहेरही भुरळ घालत असतानाच.. त्यांनी सासवड शहरात पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या संकुलात पहील्या मजल्यावर हाॅलमध्ये रांगोळीतून पंढरीची आषाढी वारी `आनंद वारी` नावाने साकारली आहे.
रांगोळी प्रदर्शन ता. 14 रोजी सायंकाळी खुले झाले. ते प्रदर्शन प्रतिसाद पाहून 21 जूनपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. सोमनाथ यांच्या पंढरीच्या वारीनिमित्त साकारलेल्या चित्रमय भव्य अकरा रांगोळीच्या प्रदर्शनाचे उद्धाघाटन हभप गुरुवर्य भाऊसाहेब महाराज पाटील (बेळगाव) यांच्या हस्ते ता. 14 रोजी झाले.
यावेळी प्रभाकर शेट्टु सांब्रेकर महाराज, शंकर बाबली महाराज, माजी प्रचार्य अरुण सुळगेकर, प्राचार्य इस्माईल सय्यद आदी उपस्थित होते. या रंगावलीच्या उपक्रमात सोमनाथ भोंगळे यांच्यासह प्रिया दुधाळ, रिया भोंगळे, अविष्कार भोंगळे, अभिषेक शिंदे, मनाली गायकवाड, कौस्तुभ वर्तक आदी 22 कलाकार चार दिवस सहभागी राबले.
त्यातून ह्या कलाकृती साकारल्या. समन्वयक माजी नगरसेविका व नगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सीमा सोमनाथ भोंगळे यांनी उपक्रमाला 60 हजार रुपयांचा आर्थिक हातभार लावला. हे प्रदर्शन सासवडला ता. 21 जून सायंकाळपर्यंत चालणार आहे.
का सोमनाथ लक्ष खेचतायेत..?
खरे तर सोमनाथ भोंगळे (वय 45) यांनी गरीबीतून कमवा शिका पध्दतीने शिक्षण घेत.. पेटींग, एटीडी पासून जी. डी. आर्टस पर्यंत शिकले. मग बोर्ड रंगविणे, शाळांच्या भिंती कार्टून चित्रांनी बोलक्या करणे व रांगोळीत कौशल्य दाखवित रोजी रोटीचा प्रश्न संपविला. मात्र पुढे कलेत काही प्रगती हवी म्हणून त्यांनी अगोदर अमिताभ बच्चनच्या व्यक्तीचित्र रंगावली दर्शनाचा प्रयोग करुन प्रदर्शन भिरविले.
त्यास प्रतिसाद मिळाला व लोकांची सण - उत्सव आणि सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमांची रांगोळीचे कामे येऊ लागली. आता तर गेली चार वर्षे सोमनाथ यांनी `थ्री - डी रंगोळी`व्दारे धमाल उडवून दिली आहे. अगदी एखादी व्यक्ती, वस्तु, चित्र `थ्री - डी` रांगोळीतील रचनात्मक व छाया - प्रकाशव्दारेचा इफेक्ट साधत त्रीमिती दर्शनाचा अभासच निर्माण करते.
त्यामुळे तर सोमनाथ यांच्या या रांगोळीला मुल्य आले आहे. भक्तीरंगात व लोकरंगात रंगणारे पुरंदर आज सोमनाथ यांच्या रंगावलीमध्ये रंगतेय. थ्री डी रांगोळीतील नव्या कलेची गवसणीमुळे रोज कुठेना कुठे ते रंग भरायला जातातच. ठिबक्यांची मांडणी अन् रंगांची दिलजमाई ते इतकी बेमालुम करतात की, रांगोळी नव्हे ते कॅमेऱयाने काढलेले त्री - डी रंगीत छायाचित्रच वाटते. छोट्यापासून ते 40 हजार चौ.फुटांपर्यंत त्यांनी सहकाऱयांसह रांगोळ्या साकारल्या आहेत.
गोव्यात पुरस्कार..
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दोन वर्षांपूर्वी कोलाज साकारले होते. त्याची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली. भारत सरकारअंतर्गत लाईफस्टाईल इन्शुरन्सच्या उद्घाटनानिमित्त.. कोल्हापूरच्या भारतीय हूमेनिटी अॅकेडमिक रिसर्च ट्रेनिंग इंस्टिट्युट फाॅर युथतर्फे पणजी (गोवा) येथे कला व सांस्कृतिक भवनात राष्ट्रीय पुरस्कार वितरण झाले.
त्यात तेथील कला संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळनकर यांच्या हस्ते सासवडच्या सोमनाथ भोंगळे यांना `आयडीयल थ्री - डी रंगोली आर्टीस्ट` या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापू्र्वीही पुण्यात प्रेरणा पुरस्कार विजय पाटकर यांच्या हस्ते मिळाला.
बच्चनकडून ब्लाॅगवर कौतुक व भेटही..
सुपरस्टार अमिताब बच्चन यांच्या चित्रपटातील प्रसंगावर काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो थेट बच्चनपर्यंत पोचल्यावर.. बच्चनजींनी हे फोटो ट्युटरच्या ब्लाॅगवर ठेवून सोमनाथ भोंगळेचा उल्लेख करुन कौतुक केले. शिवाय इच्छा दर्शविल्याप्रमाणे गतवर्षी भेटही झाली., असे सोमनाथ यांनी सकाळ ला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.