ashadi wari 2023 wari warkari palkhi sohala sant tukaram and sant dyaneshwar maharaj culture sakal
पुणे

Ashadi Wari 2023 : विठ्ठलाच्या नामघोषात रंगली पुण्यनगरी

शहरात जमला वैष्णवांचा मेळा, शहरवासियांनी केली वारकऱ्यांचे आदरातिथ्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पालखीच्या दर्शनासाठी लागलेली नागरिकांची रीघ... शहरातील मंदिरांना वारकऱ्यांनी दिलेली भेट... टाळ-मृदंगांसह विठुनामाचा जयघोष... असे भक्तीमय वातावरण मंगळवारी (ता. १३) शहरात अनुभवण्यास मिळाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी असल्याने वैष्णवांचा मेळा शहरात जमला होता. पंढरीच्या ओढीने वारीला निघालेल्या वारकऱ्यांच्या आदरातिथ्यात शहरवासियांनी कोणतीही कसर सोडली नाही.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या पालखी विठोबा मंदिर आणि जगद्‍गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रीघ लावली होती. पादुकांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असलेल्या भाविकांनी हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगांवर ताल धरत आपला उत्साह टिकवून ठेवला होता.

सकाळी आन्हिके आटोपल्यानंतर वारकऱ्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी भजन-कीर्तनाचा सोहळा रंगवला. कुठे भारूड, कुठे हरिपाठ तर कुठे फुगड्यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी आलेले नागरिकही त्यांच्यात सहभागी झाले. अनेकांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनीचे गुज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वारकऱ्यांच्या भावमुद्रा आणि वारीचे वातावरण टिपण्यासाठी तरुण मुले-मुली आपापल्या कॅमेऱ्यांसह परिसरात भटकंती करत असल्याचे पाहायला मिळाले.

या वारकऱ्यांच्या आदरातिथ्यासाठी शहरवासियांनी देखील कसून तयारी केली होती. जागोजागी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचाही अनेकांनी लाभ घेतला. वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सेवा दिली. तसेच, वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी अनेकांनी त्यांना मसाज आणि मालीश सेवा दिली.

वारकऱ्यांचा फेरफटका

वारकऱ्यांनी या मुक्कामाचे निमित्त साधत शहरात फेरफटका मारला. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, सारसबागेतील गणपती मंदिर आदी मंदिरांमध्ये जात त्यांनी दर्शन घेतले. तसेच, शनिवारवाडा, लालमहाल, पर्वती, कात्रज येथील सर्पोद्यान आदी पर्यटन स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. शहरातील बाजारपेठांनाही भेट देत वारकऱ्यांनी आवश्यक साहित्याची खरेदी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

Sakal Podcast: कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष ते कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती

कुमक कमी, तरी पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’ यशस्वी! सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभेची निवडणूक शांततेत; ८२८ बूथचे ४५ सेक्टर करून पोलिस आयुक्तांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई, चार बांगलादेशी नागरिकांना अटक

5 वर्षांनंतर सोलापूरला मिळणार स्थानिक पालकमंत्री? सोलापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशकडे मंत्रिपदाची मागणी; दोन्ही देशमुख की कल्याणशेट्टींना संधी, उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT