पुणे

पुणे कोणत्या टप्यात अनलॉक? कसे असतील नियम?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील लॉकडाउनचे (Lockdown निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट(Positivity Rate) आणि ऑक्सिजन बेडची(Oxygen bed) उपलब्धता यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे. त्या जिल्ह्यांमधील गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार कोणत्या वर्गवारीत त्याचा समावेश असेल ते ठरणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशात असलेल्या निकषांनुसार पुणे जिल्हा(Pune District) चौथ्या टप्यात अनलॉक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे कारण, गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार जिल्हयात ऑक्सिजन बेडची उपलब्धता २०.४५ टक्के तर पॉझिटिव्हीटी रेट १३.६२ टक्के इतका आहे. मात्र, याबाबतचा निर्णय घेण्याचा आणि निर्बंध शिथिल करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला असणार आहे.(At what stage will Pune district be unlocked and What will start what will stop)

पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) आठवड्यातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या दोन शहरातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी (ता. ७) घेतला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली होती.

PUNE

राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे. त्या जिल्ह्यांमधील गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार कोणत्या वर्गवारीत त्याचा समावेश असेल ते ठरणार आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर असलेले पेशंट आणिदुसऱ्या टप्प्यात 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेडवर पेशंट असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. चौथ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांहून जास्त भरलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. अखेरच्या पाचव्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त किंवा ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

pune nakabandi

राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी लागू केलेल्या टप्प्यांमध्ये पुणे जिल्हा चौथ्या टप्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. चौथ्या टप्यात पुणे अनलॉक झाल्यास पुण्यात काय सुरु, काय बंद राहणार जाणून घेऊ या...

  • सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत(सोमवार ते शुक्रवार) अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार

  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद राहणार

  • सिनेमागृह, मॉल पूर्ण बंद राहणार

  • हॉटेल्समध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहणार

  • सकाळी 5 ते 9 यावेळेत सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सुरू राहणार (सोमवार ते शुक्रवार)

  • अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती तर शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती राहणार

  • स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील

  • कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही

  • 25 लोकांची उपस्थिती लग्न सोहळा आणि 20 लोकांची उपस्थितीत अंत्यसंस्कार कार्यक्रम करणे बंधनकारक

  • राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील

  • कामगारांच्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी बांधकामं सुरू राहणार

  • दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) कृषी कामेसुरू राहणार

  • अत्यावश्यक सेवेसाठी ई कॉर्मस फक्त सुरू राहणार

  • सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहणार पण एसीचा वापर करता येणार नाही

  • 50 टक्के क्षमतेने बसेस सुरु राहणार, उभे प्रवासी नाही

  • संचारबंदीचे नियम लागू राहतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT