पुणे : पुण्यातील बावधन येथे 2017 मध्ये झालेला सनबर्न फेस्टीव्हल बॉम्बस्फोटाद्वारे उधळून लावण्याच्या प्रयत्नातील आरोपीस राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली. संबंधीत आरोपीचा नालासोपारा स्फोटक व हत्यार साठ्याशीही संबंध आहे.
प्रताप जुधीष्ठर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (वय 34, रा. नैनपुर उष्टी, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हाजरा याने गावठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. डिसेंबर 2017 मध्ये पुण्यातील बावधन येथे झालेल्या पाश्चात्य संगीत महोत्सव "सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये बॉम्बस्फोट करून घातपात घडवून आणण्याच्या कटामध्ये त्याचा सहभाग होता.
पाकिस्तानचा भारतीय संविधान जाळण्याचा कट
महाराष्ट्र एटीएसने कलकत्ता पोलिस, पश्चिम बंगाल पोलिस व एसटीएफ यांच्या मदतीने हाजरा यास सोमवारी (ता.20) अटक केली. त्यास मुंबई येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यास 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.