NIA sakal
पुणे

Pune Terrorist : एटीएसकडून पुण्यातील दहशतवादाचे प्रकरण ‘एनआयए’कडे वर्ग

पुण्यातील दहशतवादी कारवायांचा तपास आता ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे (एनआयए) वर्ग करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोथरूडमधून अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा ‘इसिस’ आणि ‘अल सुफा’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने व गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने पुण्यातील दहशतवादी कारवायांचा तपास आता ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला. न्यायालयाने मंगळवारी सर्व कागपत्रसांसह हे प्रकरण एनआयएकडे सोपविले.

सुरवातीला पुणे पोलिसांनी आणि त्यानंतर ‘दहशतवादविरोधी पथका’ने (एटीएस) या गुन्ह्याचा तपास केला होता. नव्याने गुन्हा दाखल करून तपास हस्तांतरित करण्याचा अर्ज ‘एनआयए’ने सोमवारी (ता.७) येथील विशेष न्यायालयात दाखल केला होता.

तसेच एनआयएचे तपास अधिकारी प्रवीण इंगोले यांनी गुन्ह्याचा तपास वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मंगळवारी (ता.८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाचही दहशतवाद्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. एटीएसचे तपास अधिकारी अरुण वायकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी एटीएसच्यावतीने विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी बाजू मांडली तर एनआयएच्या वतीने विशेष सरकारी वकील एस. के. सदावर्ते यांनी युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने न्यायालयात उपलब्ध असलेली या गुन्ह्यासंबंधी सर्व कागदपत्रे एटीएस आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एनआयएकडे सोपवली.

कोथरूड परिसरात दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३ दोघे रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना कोथरूड पोलिसांनी १८ जुलै २०२३ रोजी अटक केली आहे.

कोंढवा भागात याकूब साकी आणि इम्रान खान यांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा. कोंढवा) आणि त्यांना आर्थिक रसद पुरविणारा मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, मूळ रा. रत्नागिरी) देखील अटकेत आहे. तर सर्वांत शेवटी एनआयएच्या पथकाने झुल्फिकार बडोदावाला याला ताब्यात घेतले आहे.

आरोपींना बुधवारी एनआयए न्यायालयात हजर करणार

पाचही दहशतवाद्यांना प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयातून एनआयएने पाचही दहशतवाद्यांची एनआयए कोठडी घेतली आहे. त्यांना बुधवारी एनआयए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर एनआयए स्वतंत्र पद्धतीने या गुन्ह्याचा तपास करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT