Crime Sakal
पुणे

रेल्वेच्या सहायक फौजदारांवर दरोडेखोरांकडून हल्ला

जिंती रेल्वे स्थानकावर ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला.

प्रफुल्ल भंडारी

दौंड - सोलापूर जिल्ह्यातील जिंती रेल्वे स्थानकावर पंढरपूर - दादर एक्सप्रेस वर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना (Robber) रोखताना दरोडेखोरांनी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक फौजदार (Assistant Faujdar) यांच्यावर चाकूने वार (Attack) केले आहेत.

दौंड लोहमार्ग पोलिस दलाचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी या बाबत माहिती दिली. जिंती रेल्वे स्थानकावर ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला. मागील दहा दिवसांपासून दौंड - सोलापूर लोहमार्गावरील जिंती व पारेवाडी रेल्वे स्थानक परिसरात चोरीचे प्रयत्न होत असल्याने दौंड लोहमार्ग पोलिस दलाचे निरीक्षक अमित जैन व त्यांचे पथक गस्तीवर होते. पंढरपूर - दादर एक्सप्रेस क्रॅासिंग करिता जिंती रेल्वे स्थानक येथे थांबली असता ६ दरोडेखोर डब्ब्यांमध्ये घुसून शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करण्याच्या तयारीत होते. त्याची चाहूल लागताच डब्ब्यात चढणार्या दरोडेखोरांपैकी रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस पथकाने संतोष संजय काळे व अतुल्या डोंगऱ्या भोसले (दोघे रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना मोठ्या शिताफीने पकडले. परंतु झटापटीत अतुल्या भोसले याने सहायक फौजदार वाल्मिक पवार यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर चाकूने वार करून स्वतःची सुटका करीत अंधारात पळ काढला.

दरम्यान संशयित दरोडेखोर संतोष काळे (वय २०, रा. भगतवाडी) हा पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्याला सोडविण्यासाठी त्याच्या साथीदारांनी पोलिसांवरच जोरदार दगडफेक केली. परंतु पोलिसांनी त्यावर मात करून संतोष काळे याला अटक करून दौंड लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.

जखमी सहायक फौजदार वाल्मिक पवार हे भिगवण येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीत नेमणुकीस आहेत. त्यांच्या पोटरीवर टाके घालण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbadevi Assembly Constituency: ''इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे'' अरविंद सावंतांची जीभ घसरली; शायना एनसींचं प्रत्युत्तर

IND A vs AUS A: मुकेश कुमारच्या ६ विकेट्स अन् ऑस्ट्रेलिया ऑलआऊट! भारताला आता पुनरागमनाची संधी

Viral Video: पुण्यात भयंकर प्रकार, भरदिवसा बंदूक नाचवत तरुणांचा राडा; पाहा व्हिडिओ

Bhau Beej 2024 Makeup Tips: डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी असा करा 'ग्लिटर आय मेकअप', सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

अमृता खानविलकरचं स्वप्न पूर्ण! दिवाळीच्या मुहूर्तावर घेतलं नवं घर, शेअर केली झलक, घराचं नाव वाचलंत का?

SCROLL FOR NEXT