कडूस (पुणे) : भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास पक्षानेच सांगितले होते. त्याचवेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला पाहिजे होता. असा उल्लेख न करणे ही चूकच ठरली,' असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी चांडोली (ता. खेड) येथे केला.
खुद्द भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यानचा युतीमधील बेबनाव तीन महिन्यांनंतर उघड झाला. खेडमध्ये युतीकडून शिवसेनेचे सुरेश गोरे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याबाबत शिवसेनेने भाजपकडे नाराजी व्यक्त करीत देशमुख व त्यांना साथ देणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होते; परंतु पक्षाची ही कारवाई लुटुपुटूची होती, हे भेगडे यांच्या व्यक्तव्यावरून उघड झाले. राज्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ज्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्याने निवडणूक लढविली, तेथे त्यांना पक्षानेच बंडखोरी करायला लावली, हे जिल्हाध्यक्षांनीच सांगितल्याने युतीतील बेबनाव समोर आला.
राष्ट्रवादीच्या आमदाराला मोठा झटका; कारखान्याचे संचालकपद रद्द
खेड तालुक्याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ऍड. सचिन सदावर्ते, पांडुरंग ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, राजगुरुनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सचिन लांडगे, संजय रौंधळ, विष्णुपंत बोऱ्हाडे, रामदास मेदनकर, राहुल गवारे, संदीप सोमवंशी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी खेड तालुक्याच्या अध्यक्षपदी पुन्हा अतुल देशमुख यांची; तर चाकण शहराध्यक्षपदी अजय जमदाडे व कार्याध्यक्षपदी अमोल घाडगे यांची सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा भेगडे यांनी केली.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी फिक्स; मित्रपक्षाला आपल्या कोट्यातून मंत्रिपद
भेगडे यांनी या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की मित्रपक्षाने धोका दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. महाविकास आघाडी झाली खरी; पण हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. यांचे आत्ताच पटत नाही. तालुक्यातच बघा. कोल्हे, आढळराव, मोहिते आणि गोरे कधी एकत्र बसणार आहेत का? त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत भाजप हाच तालुक्यात क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे.
अजित पवारांना गृह तर धनंजय मुंडेना मिळणार 'हे' खाते
आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती; पण हे जसे आता सांगितले जाते, तेच निवडणुकीच्यावेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. - अतुल देशमुख, खेड तालुकाध्यक्ष, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.