Siddharth Jadhav Sakal
पुणे

Siddharth Jadhav : तुम्हाला भेटून दुप्पट उर्जा मिळाली

'कलाकार म्हणून माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा प्रसंग असून तुम्हाला भेटून आज मी खूप खूश झालो आहे. तुम्हाला भेटून मला दुप्पट उर्जा मिळाली आहे.

बाबा तारे

'कलाकार म्हणून माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा प्रसंग असून तुम्हाला भेटून आज मी खूप खूश झालो आहे. तुम्हाला भेटून मला दुप्पट उर्जा मिळाली आहे.

औंध - 'कलाकार म्हणून माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा प्रसंग असून तुम्हाला भेटून आज मी खूप खूश झालो आहे. तुम्हाला भेटून मला दुप्पट उर्जा मिळाली आहे. जेव्हा जेव्हा नैराश्यात असेल तेव्हा नक्की तुमच्या सकारात्मकतेच्या उर्जेचा योग्य उपयोग करील' असे गौरवोद्गार मराठी सिनेअभिनेता सिध्दार्थ जाधव यांनी काढले. गणेशखिंड रस्ता औंध येथील बालकल्याण संस्थेत दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे व बालकल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी दिग्दर्शक नितीन नंदन, अभिनेत्री नंदिता पाटकर, बालकलाकार आर्यन मेंघजी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, दिव्यांग कल्याण सहाय्यक आयुक्त शिवाजी शेळके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, बालकल्याणचे विश्वस्त डॉ. संजीव डोळे, अवधूत वाळींबे, बालकल्याणच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

'आपल्यातील व्यंगावर मात करत यश मिळवणारी हि मुले गुणवत्तेचे भांडार असून एव्हरेस्ट सर करतील यात शंका नाही.यांना घडवणा-या शिक्षकांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.' अशा शब्दांत अभिनेते जाधव यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही गौरव केला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सरकारी पातळीवर दिव्यांगासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तर बालकल्याण संस्थेचे विश्वस्त डॉ.संजीव डोळे यांनी संस्थेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'थेरपी सेंटर' विषयी माहिती दिली.

पुणे जिल्ह्यातील विशेष शाळांमधील साडेतीनशे दिव्यांग बालकांनी समूह गान, समूह वादन, शारीरिक मनोरे, योगासन व सनई चौघड्या सारखे दुर्मिळ होत चाललेल्या वाद्याचे वादन सादर केले.या कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्यातील अंध मुलींची शाळा कोथरूड पुणे, अंध मुलांची शाळा कोरेगाव पार्क, सीआर रंगनाथन कर्णबधिर विद्यालय कामायनी विद्यामंदिर गोखलेनगर, कामायनी विद्यामंदिर उद्योग केंद्र, बालकल्याण संस्थेतील विद्यार्थी, लार्क स्कूल येथील विद्यार्थी यांचा सहभाग होता. याप्रसंगी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही मुख्य पाहुण्यांच्या हस्ते झाले. बाल कल्याण संस्थेच्या अंतर्गत तयार झालेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी संस्थेचे व देशाचे नाव मोठे केले आहे. अशा सर्वांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मुकबधीरांसाठी सांकेतिक भाषेत श्रुती आठल्ये यांनी संवाद साधला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केतकी ठकार यांनी केले तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी आभार मानले.

जिल्ह्यातील ८५ विशेष शाळा व कार्यशाळामधील साडे तीन हजार दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी,त्यांचे पालक सहभागी झाले होते. यावेळी दिव्यांग व विद्यार्थ्यांना युडी ओळखपत्र वाटप करण्यात आले. तसेच राज्य सरकारच्या व्यंग-अव्यंग विवाह योजनेच्या लाभार्थींचे प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आले. कोरोना काळात सर्वसामान्य व्यक्तींनी महा शरद योजनेअंतर्गत दिव्यांगांना मदत पोहचवली अशांचाही सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT