Arundhati_Roy 
पुणे

'लोकांची हत्या करणारे मोकाट, तर कवी, विद्यार्थी तुरुंगात; लेखिका अरुंधती राॅय कडाडल्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "कवी, विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. अशा दहशतीच्या काळात आपल्या भक्कमपणे उभे रहायचे आहे. ब्राह्मणवाद, भांडवलशाही, मुस्लिमांवर अत्याचार याचे मूळ पुरुषसत्ताक विचारांमध्ये आहे. या द्वेषाच्या विरोधात आपल्याला प्रेमाची लढाई करायची आहे, असे आवाहन लेखिका अरुंधती राॅय यांनी केले. भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानतर्फे  गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित 'एल्गार' परिषदेत अरुंधती राॅय बोलत होत्या. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी आयपीएस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन, आबिदा तडवी, आयशा रेन्नारेन्ना आदी यावेळी उपस्थित होते.

आजच्या काळात भाषण करताना प्रत्येक अर्धविराम, पूर्णविरामाला पोलिस गुन्हा दाखल करतात, त्यामुळे खूप जपून बोलावे लागते असे म्हणत अरुंधती राॅय यांनी भाषणाला सुरूवात केली. राॅय म्हणाल्या, "तीन कृषी कायदे रद्द करा म्हणून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर दोन महिने आंदोलन सुरू आहे, पण आता आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या सोबत भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. 

आपल्या ज्या कार्यकर्त्यांना अटक केले आहे, ते निर्दोष आहेत. पण आपल्या देशात जात, धर्म, राजकीय पक्ष याचा विचार करून कारवाई होतो. त्यामुळे कवी, विद्यार्थी जेलमध्ये आहेत, पण लोकांची हत्या करणारे बाहेर मोकाट फिरत आहेत. न्यायालयाकडूनही जात, पंत, लिंग पाहूनच न्याय दिला जात आहे.

एल्गार परिषदेला बदनाम केले जात असताना या दहशतीच्या काळात एल्गारचे आयोजन करणे आव्हानात्मक होते. भीमा कोरेगावची लढाई होऊन २०० वर्षे झाली, पेशवे गेले पण ब्राह्मणवाद गेला नाही. २०२१ व्या शतकात ब्राह्मणवादाची संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता आली आहे, अशी टीका राॅय यांनी केली. 

कन्नन गोपीनाथन म्हणाले, "सरकारला जाब विचारला तर तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्षलवादी, जिहादी, देशद्रोही असे नाव दिले जात आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत हे विसरू नका, प्रश्न विचारलेच पाहिजे. नागरिक त्यांच्या हक्कासाठी लढत राहिले तरच हा देश टिकणार आहे. सिलेंडर, स्वच्छता गृह व बँकेत पैसे पाठवून तुमचा प्रश्न विचारण्याचा हक्क काढून घेतला जात आहे. 

बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, "केवळ चर्चा केल्याने मनुवाद संपणार नाही. आपण जाती-जातींमध्ये विभागलो गेलो आहोत. आपण सर्वजण एक झालो तरच मनुवाद आणि मनीवादा विरोधात लढता येईल. तुम्ही या देशाचे मालक आहात, जातीच्या नेत्यांच्या मागे पळू नका."

एस. एम. मुश्रीफ म्हणाले, "देशातील अनेक बाॅम्बस्फोट ब्राह्मणी व्यवस्थेने केले, पण त्यासाठी मुस्लिम तरुणांना पकडून चार्जशीट दाखल केली. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले नसते तर सर्व सत्य समोर आले असते. आयबी आणि प्रसार माध्यमांमधील ब्राह्मणी व्यवस्थेला हाकलून दिल्या शिवाय आपण स्वंतत्र होऊ शकच नाही."

सुधीर ढवळेंच्या पत्राचे वाचन
भीमा कोरेगाव प्रकरणात अटक असलेले सुधीर ढवळे यांनी जेलमधून लिहिलेले पत्र एल्गार परिषदेत वाचन करून दाखविण्यात आले. यामध्ये त्यांनी सध्याच्या व्यवस्थेवर टीका केली. दरम्यान, एल्गार परिषदेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता, वरिष्ठ अधिकारीही याठिकाणी नजर ठेवून होते. एल्गार परिषदेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर  व्हिडिओ शुटींगही केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT