Shambhu and Radha Marriage sakal
पुणे

Manchar News : अवसरी खुर्द येथे लग्नाच्या वरातीऐवजी केले कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन

डी. के. वळसे पाटील

मंचर - लग्न समारंभ झाल्यानंतर वर कुटुंबियांकडून धुमधडाक्यात वरात साजरी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कानठळ्या बसविणारया डीजेच्या कर्कश आवाजाच्या तालावर वरातीत बेधुंदपणे नाचणारी तरुणाई हे दृश्य सर्वत्र सध्या पहावयास मिळत आहे. परंतु या सर्व प्रकाराला फाटा देऊन आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द गावात वराती ऐवजी कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील येथील सोमनाथ मोराजी राजगुरू यांचे चिरंजीव शंभू व चिंचोली गुरव (ता. संगमनेर) येथील नानासाहेब तुपसुंदर यांची कन्या राधा यांचा विवाह नांदूर-शिंगोटे (ता. सिन्नर) येथे रविवारी (ता. २१) झाला. अवसरी खुर्द येथे वऱ्हाड आले.

रात्री वरात धुमधडाक्यात होईल. अशी अपेक्षा मित्रपरिवाराची होती. पण राजगुरू कुटुंबीयांनी वरातीऐवजी मधुकर महाराज गायकवाड यांचे कीर्तन आयोजित केले होते. कीर्तनाला संभा शिंदे, लक्ष्मण लोंढे, अर्जुन पंचरास आदी टाळकर्यांनी साथ दिली.

'लग्न प्रसंगी फेटे, साड्या वाटप आदी मानपान, मद्यपान व यांसह मोठा गाजावाजा करून लग्न व वराती केल्या जातात. त्यातून तरुण पिढी व्यसनाधीन होते. त्यामुळे यापुढे वरातीऐवजी कीर्तन किंवा व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करावेत.'

- मधुकर महाराज गायकवाड, गावडेवाडी (ता. आंबेगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT