CA Institute sakal
पुणे

जयंतीदिनी डॉ. आंबेडकरांचा उल्लेख टाळला

रिपाइंचे सीए इन्स्टिट्यूट विरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हेतुपुरस्सर उल्लेख न केल्याच्या निषेधार्थ सनदी लेखापालांची संस्था ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी सीए इन्स्टिट्यूटने खेद व्यक्त करत डॉ. आंबेडकर यांचा यथोचित सन्मान करण्याचे आश्वासन दिले.

बिबवेवाडी येथील ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेसमोर रिपाइंचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. याप्रसंगी रिपाइंचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, बसवराज गायकवाड, बाबूराव घाडगे, महिपाल वाघमारे, नीलेश आल्हाट, वसंत बनसोडे, मोहन जगताप, उद्धव चिलवंत, श्याम सदाफुले, रामभाऊ कर्वे, बाळासाहेब शेलार, अंबादास कोतले, सुगत धसाडे, बाळू साळवे, प्रकाश निंबाळकर, विक्की शिंदे, सदा शिंगे, सुधाकर राऊत, अर्जुन कांबळे आदी उपस्थित होते.

‘रिपाइं’च्या शिष्टमंडळाने पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पाठारे यांच्याकडे निवेदन दिले. सनदी लेखापालांच्या संस्थेने १४ एप्रिल रोजी देशभरातील सनदी लेखापालांना शुभेच्छा संदेश पाठवला होता. त्यात विविध सणांच्या शुभेच्छा दिल्या. परंतु डॉ. आंबेडकर जयंतीचा उल्लेख केला नव्हता. अर्थतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉ. आंबेडकरांची जयंती जगभर साजरी होते. मात्र, सीए इन्स्टिट्यूट त्यांचा नामोल्लेख टाळते, हे निंदनीय आहे. या संदर्भात सीए इन्स्टिट्यूटच्या दिल्ली कार्यालयानेही जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: "कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा", निरोप समारंभात सरन्यायाधीश झाले भावूक

Ranji Trophy 2024-25: मुंबईची मोठ्या आघाडीमुळे विजयाकडे वाटचाल, तर दुसरीकडे ३३९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची खराब सुरूवात

Fact Check : मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करा! 'मविआ'कडे संघटनांनी अट ठेवल्याचा 'तो' दावा खोटा

Mrinal Kulkarni : आईचं निधन.. पण शो मस्ट गो ऑन, मृणाल कुलकर्णी काही दिवसांतच कामावर रुजू

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

SCROLL FOR NEXT